शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

नंदादीप अखंड तेवत ठेवणारे माऊली!

By admin | Updated: February 19, 2015 01:56 IST

दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़

संजय जाधवल्ल पैठण (जि़ औरंगाबाद)दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़ मंदिरातील दिव्यांसाठी तेल पुरविता पुरविता लक्ष्मण मडके यांच्या कार्याची दखल घेत पैठणकरांनी त्यांना माऊली ही पदवी बहाल केली आहे. पैठण शहरात शेकडो वर्षांची परंपरा असलेले मंदिरे आहेत. यात ग्रामदैवत असलेले ढोलेश्वर महादेव मंदिर, गाढेश्वर महादेव, सिद्धेश्वर महादेव, पार्वती, सोमनाथ, इंद्रेश्वर, मल्लिनाथ, मुक्तेश्वर, नागनाथ, भैरवनाथ, उत्तरेश्वर, खोलेश्वर, पिंपळेश्वर, संगमेश्वर आदींसह अनेक महादेवांची मंदिरे आहेत. एकवीरा देवी, कालिका मंदिर, चिचाया मंदिर, सप्तमातृका मंदिर, पीठजा मंदिर, शनि भगवान मंदिर आदीसह अनेक शक्ती मंदिरे, गणेश मंदिरे आहेत. यादव काळात पैठणमध्ये शेकडो मंदिरे निर्माण झाली. यानंतरच्या काळात पैठणने एकनाथ, भानुदास, ज्ञानेश्वर, शिवदिननाथ, कृष्णदयार्णव, अमृतरायजी असे संत दिले. त्यांच्या काळात शहरात अनेक मठ व मंदिरे निर्माण झाली. यातील अनेक मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरात मूर्तीसमोर दिवा लावला जातो तो माऊलींच्या अथक प्रयत्नातूनच.तेलासाठी फेरीच्मंदिरातील दिव्यांना तेवत ठेवण्यासाठी तेल लागते़ प्रारंभीच्या काळात लक्ष्मण मडके स्वत:च्या घरून तेल आणून दिवा लावत. हे करता करता शहरातील इतर मंदिरांत दिवा लावावा, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली; परंतु हे परवडणारे नव्हते. च्यातून मार्ग काढताना त्यांनी शहरात फिरून यासाठी निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार आठवड्यातून दोन दिवस फेरी काढून व निधी जमा करून अनेक मंदिरात दिवे लावण्याचे कार्य त्यांनी सफल केले. जसजसा निधी वाढू लागला तशतशी मंदिराची संख्या वाढत गेली. अवघ्या काही दिवसांत त्यांचे हे कार्य समाजमान्य झाले. मंदिरात दिव्यांना तेल पुरवूनही निधी उरत होता.सन्याशी बुवाने मागितले वचनलक्ष्मण मडके साधारण तिशीत होते. तेव्हा ते शहराचे ग्रामदैवत ढोलेश्वर मंदिरात नियमित दर्शनासाठी जात असे. तेथे सेवेसाठी काशी येथून वृद्ध सन्यासी शंकरबुवा आलेले होते. त्यांनी लक्ष्मण यांना बोलावून मंदिरात तू जिवंत असेपर्यंत दिवा चालू ठेवशील असे मला वचन दे, असा प्रस्ताव ठेवला. त्यांनी शंकरबुवा या सन्याशाला तत्काळ वचन दिले, ते वर्ष होते १९७४. हे वचन ते आजही पाळत आहेत.