शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नायब तहसीलदारास दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 22:14 IST

भूमिअभिलेखक कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करुन घेण्यासाठीचे आदेश काढण्याकरीता दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पूर्णा तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या

ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. 21 -  भूमिअभिलेखक कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करुन घेण्यासाठीचे आदेश काढण्याकरीता दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पूर्णा तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात रंगेहाथ पकडले.पूर्णा येथील तहसील कार्यालयात महसूल विभागात मधुकर विश्वनाथ दलाल हे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. २० जुलै रोजी तक्रारदाराने पूर्णा परिसरातील गट ४५ ची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करुन घेण्यासाठी आदेशाची मागणी नायब तहसीलदार दलाल यांच्याकडे केली होती. त्यावेळी दलाल यांनी हे आदेश काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीच्या पथकाकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सायंकाळी ५ वाजता दलाल यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी दोन पंचासमक्ष ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक नारायण बेंबडे, पोलिस निरीक्षक अनिल गव्हाणकर, हवालदार लक्ष्मण मुरकुटे, राजू ननवरे, शिवाजी भोसले, पोलिस नाईक लक्ष्मण उपलेंचवार, सचिन गुरसुडकर, सारिका टेहरे, भालचंद्र बोके, मुंडे यांनी केली. पोलिस उपअधीक्षक बेंबडे तपास करीत आहेत.