शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘आॅटो हब’ उभारा

By admin | Updated: December 8, 2014 02:14 IST

रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आॅटोमोबाइल उद्योगामध्ये आहे. एका मोठ्या उद्योगामुळे १०० ते ३०० सहायक युनिटला काम मिळते.

नागपूर : रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आॅटोमोबाइल उद्योगामध्ये आहे. एका मोठ्या उद्योगामुळे १०० ते ३०० सहायक युनिटला काम मिळते. विदर्भात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने नागपुरात आॅटोमोबाइल हब स्थापन करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. खा. दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की सरकारने नागपुरात आॅटो हब स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपण तीन वर्षांपासून त्याचा पाठपुरावा करीत आहोत. यापूर्वीही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले होते. मात्र तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री प्रत्युत्तर देण्यास अपयशी ठरले. त्यांनी मला आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही, असे खा. दर्डा यांनी पत्रात म्हटले आहे.मी ३० ते ४० आॅटोमोबाइल उद्योजकांना (दुचाकी आणि तीनचाकी) आपला विस्तारीकरण प्रकल्प विदर्भात सुरू करण्याची विनंती केली होती. त्यापैकी बहुतांश जणांनी आॅटो हब स्थापनेसाठी होकार दिला आहे. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) उद्योगमंत्री असताना त्यांनी सुद्धा विदर्भात आॅटो उद्योग सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्याचाच परिणाम म्हणून अशोक लेलँडने ट्रक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. पण कंपनीने भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे केवळ स्टॉक यार्ड सुरू केल्याचा उल्लेख खा. दर्डा यांनी पत्रात केला आहे.दर्डा यांनी म्हटले आहे, की साहाय्यक युनिट नसल्याने आॅटो क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी विदर्भात गुंतवणूक करण्यास नकार दिला. पण महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा ट्रॅक्टर प्रकल्प यास अपवाद ठरला. हा प्रकल्प साहाय्यक युनिटविना हिंगणा एमआयडीसी परिसरात यशस्वीरीत्या सुरू आहे. दर दिवशी पाच ट्रॅक्टर उत्पादनाच्या क्षमतेने सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या दर दिवसाला २५० ट्रॅक्टरचे उत्पादन करण्यात येत असल्याचे दर्डा यांनी पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे भागात अनेक औद्योगिक युनिट उभे राहिले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या अन्य भागांत उद्योग सुरू करण्याची नितांत गरज आहे. आॅटो हब स्थापन करण्याच्या योजनेला मुख्यमंत्री नक्कीच प्रतिसाद देतील आणि त्यासाठी सकारात्मक पावलेही उचलतील, असा विश्वास दर्डा यांनी पत्रात व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)