शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ होणार

By admin | Updated: August 21, 2016 03:10 IST

विमान निर्माण उद्योगामध्ये नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ म्हणून लवकरच पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

नागपूर : विमान निर्माण उद्योगामध्ये नागपूर ‘एअरोस्पेस इंडस्ट्री हब’ म्हणून लवकरच पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.मिहानमधील टाटा उद्योग समूहाच्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशनतर्फे ड्रीमलायनर ७८७-८ आणि १० बोर्इंग विमानांसाठी निर्माण केलेल्या पाच हजाराव्या फ्लोअर बीमच्या पुरवठ्यासंदर्भातील कन्साईनमेंटचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेशनिवारी करण्यात आला. तसेच विमानासाठी लागणाऱ्या सुटे भाग निर्मिती विभाग जेनेरिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.या समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष देशमुख, अनिल सोले, महापौर प्रवीण दटके, बोर्इंगच्या आशिया पॅसिफिक अ‍ॅण्ड इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) डॉ. दिनेश केसकर, डॉ. आर. ए. माशेलकर, बोर्इंग इंडिया लि.चे अध्यक्ष डॉ. प्रत्युशकुमार, ‘ताल’चे अध्यक्ष आर.एस. ठाकूर, कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री, मुख्य कार्यान्वयन अधिकारी लोकेश श्रीवास्तव, टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी गुंटर बट्सचेक आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ताल’ने उच्च दर्जाचे फ्लोअर बीम निर्माण करून मिहानचे नाव जागतिक स्तरावर पोहोचविले आहे. दिनेश केसकर यांच्या प्रयत्नामुळेच एमआरओ आणि ‘ताल’ सुरू झाले. ‘ताल’ हे मिहानसाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर ठरणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेत नागपूर हे ‘मेड फॉर वर्ल्ड’ झाले आहे.‘ताल’मध्ये कार्यरत ८० टक्के युवकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून फ्लोअर बीमचीनिर्मिती केली आहे. जागतिक स्तरावरील उत्पादनासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ नागपूरसह विदर्भात असल्यामुळे जागतिक स्तरावरील प्रवासी विमाने एमआरओमध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी येत आहेत. यासंदर्भात स्पाईस जेटसोबत करार करण्यात आला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)