शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : पीएचडी नोंदणीसाठी दुहेरी आव्हान

By admin | Updated: July 26, 2016 20:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ह्यपेटह्णसाठी (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २६  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ह्यपेटह्णसाठी (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. १ आॅगस्टपासून ह्यपेटह्णसाठी नोंदणी सुरू होणार असून १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत पेटची पहिली परीक्षा घेतली जाणार आहे. यंदापासून पेटच्या विषयनिहाय परीक्षा होणार असून उमेदवारांना दुहेरी आव्हानांचा सामना करायचा आहे हे विशेष.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार विद्यापीठानेही 'पेट'च्या नियमावलीत काही बदल केले आहेत. 'पेट' यंदा आॅनलाईन आणि लेखी अशा दोन स्तरावर होणार आहे. त्यानुसार दोन पेपर होतील. यात पहिला पेपर हा १०० गुणांचा असून 'अ‍ॅप्टिट्यूट टेस्ट' पद्धतीचा असेल. तर दुसरा पेपर हा विषयनिहाय आणि लेखी पद्धतीने घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेमध्ये स्वतंत्ररीत्या ५० टक्के घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. अनुसूचित जाती, जमातीसाठी ही मर्यादा ४५ गुणांची राहणार आहे. 'पेट' उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी नोंदणी करण्यासाठी तीन वर्षांची मर्यादा दिली आहे. या तीन वर्षांत नोंदणी न केल्यास त्याला पुन्हा 'पेट' द्यावी लागणार आहे.पेट-२अंतर्गत ६४ विषयांची परीक्षाविषयनिहाय यासाठी ६४ विषयांची निवड करण्यात आली असून उमेदवाराला आठ प्रश्न देण्यात येणार आहेत. त्यातील पाच प्रश्न सोडवणे अनिवार्य राहणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी १० गुण राहणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या पेपरमध्ये २५ गुण घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. दोन पेपर द्यावे लागणार असल्याने उमेदवारांच्या बुद्धिमत्तेचा कस लागणार आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग व खासगी महाविद्यालयांतील संशोधन केंद्र येथे एकूण ४ हजार ५१४ जागा आहेत. यात सध्या ३ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.