शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर : तरुणीचे अपहरण करून बलात्कार

By admin | Updated: October 17, 2016 16:30 IST

पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार करणा-या नितीन उके (वय ३५) तसेच घटनेची माहिती दडवून ठेवणा-या चंढ्या नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १७ : वस्तीतील तरुणीचे अपहरण करून एका आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तर आरोपीने शंभर रुपये दिले म्हणून तरुणीला मदत करण्याऐवजी दुस-या एकाने या गंभीर गुन्ह्याची माहिती उघड न करता आरोपीला मदत केल्याचा संतापजनक प्रकार जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार करणा-या नितीन उके (वय ३५) तसेच घटनेची माहिती दडवून ठेवणा-या चंढ्या नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडित तरुणी (वय १९) हिला आरोपी नितीन उके याने १५ आॅक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला सुरादेवी गावाच्या जंगलाकडे नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपी बलात्कार करण्याच्या उद्देशाने तरुणीला मोटरसायकलवर बसवून नेत असल्याची बाब चंढ्या नामक दुस-या एका आरोपीच्या ध्यानात आली. त्यामुळे त्याने आरोपी नितीन उकेची मोटरसायकल थांबवली.

मात्र, नितीनने त्याला १०० रुपये आणि मोबाईल देताच आरोपी चंढ्या गप्प बसला. चंढ्याने ही बाब लगेच तरुणीच्या आईवडीलांना किंवा पोलिसांना कळवली असती तर बलात्काराचा गुन्हा रोखता आला असता. मात्र, चंढ्याने तसे केले नाही. मध्यरात्रीनंतर आरोपी नितीनने पीडित तरुणीला वस्तीत आणून सोडले. घटनेची माहीती आईवडीलांना सांगीतली तर जीवे मारेन, अशी धमकीसुद्धा दिली.

दरम्यान, मुलगी बराच वेळपासून घरून निघून गेल्यानंतर मध्यरात्री परत आल्याचे पाहून पालकांनी तिला विचारणा केली. त्यानंतर हा गुन्हा उजेडात आला. कशीबशी रात्र काढल्यानंतर पालकांनी रविवारी दुपारी शेजारच्या व्यक्तींना ही माहिती दिली. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तर, हा गुन्हा घडण्यास चंढ्यासुद्धा कारणीभूत असल्याचे तरुणीच्या बयानातून पुढे आल्याने त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. आरोपी फरार अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे कळताच मुख्य आरोपी नितीन उके फरार झाला. पीडित तरुणी त्याला ओळखते. मात्र, चंढ्याला केवळ चेह-याने ओळखते. त्यामुळे उकेला अटक झाल्यानंतरच चंढ्या कोण आहे, कुठे राहतो, ते स्पष्ट होईल. त्यानंतरच त्याला अटक करण्यात येईल, असे जरीपटका पोलीस सांगतात.