शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई भाडे २५ हजार

By admin | Updated: October 30, 2014 00:44 IST

नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी एअरलाईन्स कंपन्या सज्ज असून, ३१ला मुंबईत होणाऱ्या शपथविधी सोहळ््यासह विविध राजकीय घडामोडींना हेरून

एअरलाईन्स कंपन्यांची मनमानी : प्रवाशांच्या खिशाला कात्रीनागपूर : नागपूर ते मुंबई असा विमान प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी एअरलाईन्स कंपन्या सज्ज असून, ३१ला मुंबईत होणाऱ्या शपथविधी सोहळ््यासह विविध राजकीय घडामोडींना हेरून कंपन्यांनी या कालावधीत मनमानी भाडे वाढवले आहे. त्यामुळे प्रत्येकाला २२ ते २५ हजार रुपये मोजावे लागत आहेत.मागील आठ दिवसांपासूनच विमानाचे भाडे वाढले आहे. इकडे रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना विमान प्रवासाकडे वळावे लागत आहे. २३ तारखेला दिवाळी सुरू झाली. त्यामुळे ३ ते ४ दिवसांपूर्वी मुंबई, दिल्ली, पुणे येथून येणाऱ्या सर्वच फ्लाईट फुल्ल होत्या. परिणामी तिकिटांचे दर आणखीनच वाढले. यात निवडणुका आटोपल्यानंतर नागपुरातील मुख्यमंत्री होणार असल्यामुळे राजकीय नेत्यांच्या मुंबईवाऱ्या वाढल्या हेसुद्धा एक मोठे कारण आहे. दिवाळीनंतर २५ आणि २६ आॅक्टोबरनंतर पुन्हा प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू झाला. काही प्रवाशांनी १५ दिवसांपूर्वीच विमानाचे तिकीट खरेदी केलेले असल्यामुळे मुंबई, दिल्ली आणि पुण्याला जाणारी सर्वच विमाने फुल्ल झाली होती. उरल्यासुरल्या सीटसाठी विमान कंपन्यांनी मनमानी भाडे वसूल केल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. बुधवारची स्थिती पाहता जेटलाईटच्या सायंकाळच्या ५.१० वाजताच्या विमानाचे प्रवासभाडे २२ हजार आकारण्यात आले. इतर सर्व विमाने फुल्ल होती. उद्या गुरुवारी सायंकाळी ५ वाजता जेटच्या विमानाचे भाडे १० हजार ७८० रुपये आकारण्यात येत आहे. सकाळी ७.५५ वाजता असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे भाडे १२ हजार ४०० आकारण्यात येत आहे तर गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या इंडिगोच्या विमानाचे भाडे १२ हजार ६०० रुपये, गो एअरच्या ८.२० वाजताच्या विमानाचे भाडे १४ हजार ६०० रुपये आकारण्यात येत आहे. त्यानंतर ३१ आॅक्टोबरला मुंबईसाठी ८ हजार रुपये, २ नोव्हेंबरला ५ हजार ५०० रुपये आकारण्यात येत असल्याची माहिती रामदासपेठमधील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांनी दिली. मात्र, या दिवशीही वेळेवर तिकीट काढणाऱ्यांच्या खिशाला २५ हजारापर्यंतची कात्री लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विमान प्रवास करणाऱ्यांनीच दिली. दिवाळी आणि राजकीय घडामोडींमुळे प्रवाशांना प्रवासासाठी चांगलीच किंमत मोजावी लागली असून आगामी काही दिवसात विमानाचे दर पूर्ववत खाली येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)