शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला मिळणार पुणे मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम

By admin | Updated: October 15, 2016 22:40 IST

पीआयबीच्या मंजुरीनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्यात येईल. केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळेल असा विश्वास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. १५ - मुंबईत मेट्रोचे लवकरच विस्तार केला जाईल. याची अधिकृत घोषणा योग्य वेळी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत ७० लाख लोक रेल्वेने प्रवास करतात. राज्य सरकार १७० किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वे नेटवर्क उभारत आहेत. मागील सरकारने यापैकी फक्त १० किलोमीटरचे काम केले आहे. उर्वरित १६० किलोमीटरचे काम आम्ही करीत आहोत. यामुळे ८० लाख लोक प्रवास करू शकतील. जे एवढ्या वर्षात झाले नाही ते दोन वर्षात झाले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी नागपूर मेट्रो रेल्वेसाठी नागपुरातच रोलिंग स्टॉक तयार करण्याकरिता महाराष्ट्र सरकार व चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशन (सीआरआरसी) दरम्यान सामंजस्य करार झाला. याच वेळी कार्यस्वीकृती पत्र (एलओए) हस्तांतरण सोहळाही पार पडला. 
 
राज्यात नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे मेट्रो रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे नागपुरात मेट्रो रेल्वे उभारण्याचे काम सुपर फास्ट गतीने सुरू असल्यामुळे पुण्यातील रेल्वे उभारण्याचे कामही नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि. ला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात आजवर ब-याच ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्यात आले. मात्र, त्यासाठी लागणारा रोलिंग स्टॉक आयात करण्यात आला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची संकल्पना मांडली व महाराष्ट्राने ती स्वीकारली. सहा महिन्यांपूर्वी चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशनचे प्रतिनिधी आपल्या भेटीसाठी आले असता आपण त्यांच्यासमोर मेट्रो रेल्वेसाठी लागणारे रोलिंग स्टॉक नागपुरातच तयार करण्याची अट टाकली. 
 
त्यांनी ती मान्य केली. त्यामुळे आता नागपूर, महाराष्ट्रासह देशातील मेट्रो रेल्वेसाठी कोसेच मिळण्यास मदत होणार आहे. सीआरआरसी ही कंपनी नागपुरात मिहानमध्ये आपला उद्योग उभारणार असून १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून ५ हजार युवकांना रोजगार मिळेल. रोलिंग स्टॉकसाठी देशात सर्वात कमी दर नागपूर मेट्रोला मिळाले आहेत, असे सांगत यामुळे देशात स्पर्धा निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. कामाची गुणवत्ता व स्पर्धेत टिकणारे दर दिले तर महाराष्ट्रात इतर ठिकाणीही आम्हाला मेट्रोचे काम दिले जाईल, असे त्यांनी चीनच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चीनच्या कंपनीने येथे यावे यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकाराला आज यश आले, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. सामंजस्य करारावर राज्य सरकारतर्फे विकास आयुक्त (उद्योग) विजय सिंघल व सीआरआरसी तर्फे उपमहाव्यवस्थापक (ओव्हरसीज बिझनेस डिव्हिजन) झाऊ चुआनची यांनी तसेच एलओए वर एनएमआरसीएलतर्फे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग व सीआरआरसी तर्फे संचालक, (इंटरनॅशनल सिस्टीम एशिया अ‍ॅण्ड नॉर्थ अमेरिका डिपार्टमेंट) चेनचुंग टिंग यांनी स्वाक्षरी केली.