शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वी

By admin | Updated: February 11, 2016 01:41 IST

राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील पहिले किडनी प्रत्यारोपण नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या

नागपूर : राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील पहिले किडनी प्रत्यारोपण नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या मदतीने झालेले हे प्रत्यारोपण आर्थिक अडचणीत असलेल्या किडनीच्या रुग्णांना दिलासा देणारे आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या प्रयत्नांतून हा प्रयोग यशस्वी झाला. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. नागपुरात २००वर रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१४च्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न समोर आला. तेव्हा अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याची जबाबदारी घेतली. शहजादी परवीन यांची २४वर्षीय मुलगी आठ वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. ती डायलिसीसवर होती. तिला जीवनदान देण्यासाठी तिच्या आईने किडनी देण्याचे ठरविले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया झाली. मूत्रपिंड शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात सहायक प्रा. डॉ. धनंजय सेलुकर, प्रा. डॉ. समीर चौबे, नेफ्रालॉजीच्या विभागप्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. विजय श्रोत्री, सहायक प्रा. डॉ. मनीष बलवाणी व प्रत्यारोपण समन्वयक मोहिताज शेख आदींच्या सहकार्याने साडेतीन तासांत शस्त्रक्रिया झाली. (प्रतिनिधी)ब्रेन डेड (मेंदू मृत) घोषित केलेल्या व्यक्तीची (कॅडेव्हर) किडनी काढून गरजू रुग्णांमध्ये ट्रान्सप्लांट करण्यासाठी आता प्रयत्न केला जाणार आहे. या रुग्णालयाचा गरीब रुग्णांना जास्तीतजास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. मनीष श्रीगिरीवार, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल