शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारासह तलाठ्याला अटक

By admin | Updated: December 8, 2015 01:27 IST

कल्याणातील एका मटेरियल सप्लायर्सकडून २५ हजारांची लाच घेताना, कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अभिजित देशमुख यांच्यासह तलाठी जे.बी

बिर्लागेट : कल्याणातील एका मटेरियल सप्लायर्सकडून २५ हजारांची लाच घेताना, कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अभिजित देशमुख यांच्यासह तलाठी जे.बी. सूर्यवंशी याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच पकडले. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत तब्बल १५ कर्मचारी जाळ्यात सापडल्याने, कल्याण तहसील कार्यालय हे ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक भ्रष्ट कार्यालय ठरले आहे.रामबाग कल्याण येथे राहणारे तुषार पाटील यांचा रेती, विटा, खडी, डब्बर आदी बिल्डिंग सप्लायर्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायाची रॉयल्टी मिळविण्यासाठी तुषार पाटील यांनी कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी नायब तहसीलदार देशमुखने तलाठी जनार्दन सूर्यवंशी यांच्यामार्फत ३० हजारांची मागणी केली. यामध्ये तडजोड होऊन २५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. ते स्वीकारताना देशमुख याला रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठी जनार्दन सूर्यवंशी यालाही पकडण्यात आले आहे. या अगोदर तहसीलदार किरण सुरवसे यांच्याच कार्यालयातील मंडळ अधिकारी उज्ज्वल देशमुख व तलाठी सुनील पडवळलाही सप्टेंबरमध्ये पकडण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले होते. सातबारा नोंदी, फेरफार, रॉयल्टी, विविध दाखले, केसेस या प्रकरणात एजंटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पैशांशिवाय कामच होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तहसीलदार किरण सुरवसे यांचे नियंत्रण नसल्यामुळेच असे प्रकार वाढल्याचे लोकांचे म्हणणे आहे.