शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास देणे माझी जबाबदारी

By admin | Updated: July 22, 2016 00:58 IST

जनक्षोभ शांत करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.

पुणे : कोपर्डीमधील दुर्दैवी घटनेनंतर उसळलेला जनक्षोभ शांत करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याबाबत विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना आरोपीला लवकरात लवकर आणि कडक शिक्षा होण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला आहे. गावातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला असून, एक महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. कोपर्डीतील घटना अतिशय दुर्दैवी आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अत्यंत क्रूरपणे हे नराधमी कृत्य करण्यात आलेले आहे. गावामध्ये संताप आहे; मात्र नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वास दिला आहे. गावामध्ये पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षकांना दिलेले आहेत. घटना घडल्यानंतर शाळांमधली मुलींची उपस्थिती कमी झाली होती; मात्र आपण भेट दिली तेव्हा शाळांमध्ये मुली मोठ्या संख्येने हजर होत्या. शाळांमध्ये जाऊन शुक्ला यांनी मुलींशी संवाद साधला आहे. छेडछाडीचे प्रकार घडल्यास पालकांना आणि पोलिसांना न घाबरता सांगण्याचे आवाहनही त्यांनी कोपर्डीतील विद्यार्थिनींना केले. त्यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक नागरिकांना देऊन त्यावर एसएमएस करण्यास सांगितले आहे. जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्याचे शुक्ला म्हणाल्या. पुण्यामध्येही शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात येत आहे. नुकतीच प्राचार्यांची एक बैठक घेऊन अशा घटना घडत असतील तर त्या घटनांबाबत पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोपींना पाठीशी घालून त्यांची हिंमत वाढवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोपर्डीतील घटनेचा तपास जिल्हा पोलीस करीत आहेत. त्यावर पोलीस महानिरीक्षकांचे लक्ष आहे. आपण तपासाचा भाग नसल्याचे तसेच केवळ लोकांमधला विश्वास वाढवून तेथील वातावरण पुन्हा पूर्वपदावर आणण्याची आपली जबाबदारी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.