शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला!’

By admin | Updated: May 26, 2017 05:23 IST

हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर त्याचा स्फोट होईल या भीतीने सरकारी यंत्रणेसह लोक मिळेल त्या वाटेने पळ काढत होते. मात्र भंगारच्या दुकानात थांबलेल्या २८ वर्षांच्या इरफान

गोविंद इंगळे । लोकमत न्यूज नेटवर्कनिलंगा (लातूर) : हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर त्याचा स्फोट होईल या भीतीने सरकारी यंत्रणेसह लोक मिळेल त्या वाटेने पळ काढत होते. मात्र भंगारच्या दुकानात थांबलेल्या २८ वर्षांच्या इरफान शेखने ‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला,’ अशी आरोळी ठोकली. तो मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी धावला अन् त्याने मुख्यमंत्र्यांना बाहेर काढले.अपघातानंतर लोक वाट मिळेल तिकडे पळत होते. पण इरफान धाडस दाखवून मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावला. ‘हमारा राजा अंदर अटका है’ म्हणत हेलिकॉप्टरजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आतून मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, तेव्हा इरफानने बाहेरून दरवाजा ओढून काढला. मुख्यमंत्र्यांचा हात धरून त्यांना बाहेर घेतले. मुख्यमंत्री इरफानला म्हणाले, ‘मी फिट आहे, ओके आहे, पायलट व इतरांना बाहेर काढा’. त्यानंतर ते डीपीच्या बाजूला जाऊन थांबले. तेवढ्यात अनेक अधिकारी धावून मुख्यमंत्र्यांजवळ आले. अ‍ॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री अ‍ॅम्ब्युलन्समधून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या घराकडे रवाना झाले. स्वत:च्या भंगारच्या दुकानात हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडेच मी पाहत थांबलो होतो. काही कळायच्या आतच हेलिकॉप्टर कोसळले. स्फोट होईल या भीतीने लोक सैरावैरा पळाले असले, तरी माझ्या मनात ती शंका आली नाही. उलट माझ्या मनात हेलिकॉप्टरमधील मुख्यमंत्री साहेब आणि अन्य अधिकाऱ्यांना कसे बाहेर काढता येईल, हाच विचार क्षणार्धात आला आणि मी हेलिकॉप्टरकडे धावत गेलो, असे इरफान याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.