शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

त-हाळा दर्गास्थळी मुस्लीम संतांची मांदियाळी!

By admin | Updated: March 30, 2017 02:46 IST

दादा हयात कलंदर यांचा ऊर्स महोत्सव; ३१ मार्च रोजी रंगणार कव्वालीचा मुकाबला.

नाना देवळे मंगरूळपीर (जि. वाशिम), दि. २९- मंगरूळपीर येथील दादा हयात कलंदर यांच्या ऊर्स महोत्सवास २८ मार्चपासून प्रारंभ झाला. ३0 मार्चपर्यंत चालणार्‍या या महोत्सवासाठी जगभरातील तथा विविध पंथांमधील मुस्लीम संतांनी तद्वतच पठाण बांधवांनी उत्स्फूर्त हजेरी लावली असून, जगप्रसिद्ध तर्‍हाळा येथील सैयद बाबाजान दग्र्यावर या मंडळींची मांदियाळी जमली आहे.इस्लाम धर्मीयातील साडेतीन कलंदरपैकी एक असलेले अहमद कबीर ऊर्फ दादा हयात कलंदर यांच्या ७८७ व्या ऊर्स महोत्सवास २८ मार्चपासून उत्साहात प्रारंभ झाला. यादरम्यान मंगरूळपीर येथील हिंदू धर्मीयांनी मुस्लीम समाजातील संतांचा आदरसत्कार करून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडविले. संदल शरीफच्या माध्यमातून दादा हयात कलंदर यांच्या दग्र्यावर चादर चढवून या उत्सवाची सुरुवात झाली. या ऊर्सनिमित्त तर्‍हाळा येथील दर्गाप्रमुख सैयद बद्रुद्दीन आगासाहेब सैयद शिराजोद्दीन आगासाहेब यांच्या हस्ते ३0 मार्चला ह्यनिशाणह्ण या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ३१ मार्च रोजी कव्वालीचा मुकाबला, १ एप्रिल रोजी खतमाचा कार्यक्रम होईल. या विविध कार्यक्रमांसाठी अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराक-इराण आदी देशांमधील पठाण बांधवांनी तर्‍हाळाच्या दग्र्यावर गर्दी केली आहे. यासह मुस्लीम समाजातील रफाई पंथ, जलाली पंथ, सुफी पंथामधील संतांनीही उपस्थिती दर्शविली आहे.