शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात मुस्लीम समाजाचा मोर्चा

By admin | Updated: October 8, 2016 04:21 IST

सच्चर आयोगाच्या शिफारशींनुसार मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे

मुंब्रा : सच्चर आयोगाच्या शिफारशींनुसार मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी मुंब्रा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चा असल्याने त्याला ‘खामोश मोर्चा’ असे नाव देण्यात आले होते. राज्यातील हा पहिलाच मोर्चा होता. या मोर्चात शाळकरी मुले, तरूण, महिला, पुरुष, आणि मौलवीसह धार्मिक, राजकीय नेते सहभागी झाले होते. दुपारच्या नमाज पठणानंतर दारुल फलाह मशिदीपासून मोर्चाला सुरुवात झाली. अडीचच्या सुमारास मोर्चा रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला. ‘मुस्लिम देश का हिस्सेदार है, किरायेदार नहीं’, ‘मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे,’ या फलकांसह ‘उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम,’ असे फलक शाळकरी मुलांनी हाती धरलेले होते. प्रत्येक चौकात नागरिक मोर्चात सहभागी होत होते. त्यात महिला, मुले, पुरुष मंडळींचा समावेश होता. मुंब्रादेवी देवस्थानच्या कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. बंदोबस्तासाठी पोलिस उपायुक्त आशुतोष त्रिपुत्रे उपस्थित होते. उच्च न्यायालय, सच्चर आयोग, मिश्रा समिती, गोपाल समिती यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. पण त्यानंतरही भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते हुसेन दलवाई यांनी केला. मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागणीला धार्मिक आरक्षण संबोधले जाते. पण ही धार्मिक आरक्षणाची मागणी नाही. हा समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्याची स्थिती दलित आणि आदिवासींसारखीच आहे. मुस्लिमांमधील ओबीसींसाठी ४.५ टक्के आरक्षण द्यावे, तसेच नोकरी व शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण द्यावे. मुस्लिमांची राज्यातील लोकसंख्या ११.५ टक्के आहे. मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीचे अनुकरण केले आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते व ज्येष्ठ वकिल माजिद मेमन यांनी मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा अधिकार कायद्याने योग्य ठरविल्याचे सांगितले. पण भाजप व शिवसेनेचे सरकार मुस्लिमांच्या कायदेशीर अधिकाराची अंमलबजावणी करण्यास नकार देत आहे. वेळकाढूपणा, चालढकल करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण मोर्चाप्रमाणेच मुस्लिम समाजानेही सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. मुस्लिम समाजाच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड सुरुवातीपासून मोर्चात सहभागी होते. मोर्चा संपल्यावर त्यांनी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन आरक्षणाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सादर केले. (प्रतिनिधी)>ठाणे, चिपळूणमध्ये १६ ला मोर्चामुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही कोअर कमिटी स्थापन केली आहे. आरक्षणाचा पुढील मोर्चा ठाणे, चिपळूणमध्ये काढला जाणार आहे. या दोन्ही मोर्चाची तारीख १६ नोव्हेंबर आहे. चिपळूणच्या मोर्चात मी स्वत: सहभागी होणार आहे, असे दलवाई यांनी जाहीर केले. कमिटीच्या निर्णयानुसार कल्याण, भिवंडी, मालेगाव येथे मोर्चाचे आयोजन केले जाईल.