शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांनी केले ‘हात वर’ पानसरे मारेकऱ्यांची माहिती नाही

By admin | Updated: July 30, 2015 00:48 IST

‘त्या’ संघटनेबाबत बोलायचे होते...

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची नावे पोलिसांना माहीत आहेत, असा गौप्यस्फोट करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी आता त्यासंबंधी अधिक माहिती देण्यास ‘हात वर’ केले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’च्या पथकाला त्यांनी याप्रकरणी आपल्याकडे ‘स्पेसिफिक’ काही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे या अतिशय संवेदनशील प्रकरणात त्यांनी अत्यंत स्वैरपणे हा आरोप केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मुश्रीफ यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.कोल्हापूर महापालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या पानसरे स्मारकाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी (दि.२४ जुलै) सकाळी मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला होता. मुश्रीफ म्हणाले होते की, ‘मला पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’मधील अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मारेकरी सापडले आहेत परंतु राज्य सरकार मारेकऱ्यांची नावे जाहीर करण्यास प्रतिबंध करत आहे.’ मंगळवारी व बुधवारीही त्यांनी यासंबंधी कोणतीच माहिती विधानसभेत दिलेली नाही. मुश्रीफ सभागृहात उपस्थित होते परंतु बुधवारी दिवसभर याकूबच्या फाशीवरून सभागृहात गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज झाले नाही (प्रतिनिधी)‘त्या’ संघटनेबाबत बोलायचे होते...मुश्रीफ यांच्या या विधानाने राज्यभर खळबळ उडवून दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशीही त्यांनी आपण केलेल्या विधानावर ठाम असून, मंगळवारी (दि. २८ जुलै) विधानसभेत त्याची माहिती देणार असल्याचे जाहीर केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. त्यांनी मुश्रीफ यांच्याकडे या आरोपांबाबतची माहिती घेण्यासाठी पथक पाठविले परंतु त्यांनी आरोपींची अथवा ज्या अधिकाऱ्याने त्यांना ही माहिती दिली, असे ते सांगतात त्यांचीही माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. डाव्या चळवळीतील कार्यकर्ते ज्या संघटनेवर संशय व्यक्त करतात त्यांच्या बाबतच आपल्याला बोलायचे होते, असे या चौकशीत मुश्रीफ यांनी सांगितले परंतु त्याबद्दल अन्य कोणतीच माहिती ते देऊ शकले नाहीत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.