शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी

By admin | Updated: September 30, 2016 04:57 IST

गणपतीनंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नऊ रात्रींच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी शहरातील देवीची विविध मंदिरे सज्ज झाली आहेत. उद्या (दि. १ आॅक्टोबर) मंदिरांसह घरोघरी

पुणे : गणपतीनंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. नऊ रात्रींच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी शहरातील देवीची विविध मंदिरे सज्ज झाली आहेत. उद्या (दि. १ आॅक्टोबर) मंदिरांसह घरोघरी होणाऱ्या देवीच्या घटस्थापनेसाठी सकाळी ६.१५ ते १०.२४ हा सर्वोत्तम मुहूर्त आहे.घटस्थापनेने सुरू होणारा नवरात्रोत्सव यंदा ११ दिवसांचा असून, शनिवारी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होत असलेल्या देवी नवरात्र महोत्सवाची घटस्थापना सूर्योदय ६.१५ ते १०.२४ या वेळात करावी, असे शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले. पहाटे साडेपाचनंतर उद्या (शुक्रवारी) असणारी सर्वपित्री अमावास्या संपत असल्यामुळे त्यानंतरच घटस्थापनेने नवरात्रारंभ करावा, असेही ते म्हणाले. नवरात्रोत्सव ११ दिवसयंदाच्या घटस्थापनेची प्रतिपदा ही प्रारंभिक तिथीच शनिवारी आणि रविवारी अशी २ दिवस आल्यामुळे विनायक चतुर्थी ५व्या दिवशी (बुधवार, दि. ५ आॅक्टोबर) व दुर्गाष्टमी ९व्या दिवशी (रविवार, दि. ९ आॅक्टोबर), महानवमी १०व्या दिवशी (सोमवार, दि. १० आॅक्टोबर) आणि विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण ११व्या दिवशी (मंगळवार, दि. ११ आॅक्टोबर) येऊन नवरात्र महोत्सव ११ दिवस चालणार आहे. या नवरात्रोत्सवात देवीच्या षोडशोपचारांतील महापूजेचा एक महत्त्वाचा अनिवार्य भाग म्हणून पंचांगश्रवण, कथावाचन, नृत्य, गीत, वाद्य अशा ललितकलांचेही कार्यक्रम राजोपचार सेवा म्हणून सादर करावेत, असे आवाहन पं. गाडगीळ यांनी केले आहे.