शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:15 IST

पामबीच रोडवर सोमवारी पोलिसांना मरियम शेख या तरुणीचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नवी मुंबई : पामबीच रोडवर सोमवारी पोलिसांना मरियम शेख या तरुणीचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी इम्रान खुद्देश सलमानीला अटक केली असून, एकतर्फी प्रेमातून हा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.करावे गावामध्ये राहणाºया महेंद्र तांडेल यांना सोमवारी सकाळी १० वाजता पामबीच रोडवर एक बॅग बेवारस स्थितीमध्ये आढळून आली. बॅगेच्या बाजूच्या पाण्यामध्ये रक्त मिसळले असल्याचे निदर्शनास आल्याने, तांडेल यांनी बॅगेचे तोंड उघडून पाहणी केली असता, तरुणीचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याविषयी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. एनआरआय पोलीस स्टेशनमधील हवालदार नरवडे यांनी मयत महिलेला ओळखले. सीवूड सेक्टर-४४ मधील ग्रेसफुल हेअर कटिंग सलूनमध्ये ती काम करत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्या महिलेचे नाव मरियम अब्दुल रहिम शेख असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी सलूनमधील सीसीटीव्हींची तपासणी केली असता, येथे काम करणाºया इम्रान सलमानी या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. चौकशीदरम्यान त्याच्या गळ्यावर, कपाळावर ओरखडे आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर,त्याने खून केल्याची कबुली दिलीदोघांचे भांडण-आरोपी इम्रान मयत मरियमवर एकतर्फी प्रेम करत होता, परंतु तिचा दुसºया मुलाबरोबर साखरपुडा झाल्याने त्याला राग आला होता. तिला लग्नासाठी आग्रह करू लागल्याने दोघांमध्ये भांडण झाले होते. या भांडणातून त्याने गळा दाबून तिचा खून केला. पोलिसांना सापडू नये, यासाठी युवतीच्या शरीराचे तुकडे करून ते बॅगमध्ये भरले व पामबीच रोडवर टाकून दिले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे, परिमंडळ-एकचे उपआयुक्त सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, अशोक फल्ले, भूषण कापडणीस, पोलीस हवालदार विष्णू नरवाडे, दीपक सावंत, सुधीर पाटील यांनी केला आहे.