शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमध्ये गावठाण जागेच्या वादातून दलित तरुणाचा खून

By admin | Updated: August 17, 2016 16:23 IST

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे गावठाण जागेच्या मालकी हक्का वरून दोन गटात( दलित- मुस्लीम) तुंबळ हाणामारी झाली.

श्यामकुमार पुरे/ ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 17 - सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे गावठाण जागेच्या मालकी हक्का वरून दोन गटात( दलित- मुस्लीम) तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दलित युवकाचा बुधवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ८ लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक केली आहे.७ आरोपीं फरार आहे. या घटनेमुळे डोंगरगाव येथे तणाव पूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेत मरण पावलेल्या दलित युवकाचे नाव अमोल अशोक दांडगे वय २८ वर्ष रा.डोंगरगाव असे आहे. तर त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या शेख मोहम्मद जाकीर शेख मोहम्मद उमर (वय ३४ रा. डोंगरगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे. इतर ७ फरार आरोपी म्हणजेच इसाक उमर शेख, अहेमद उमर शेख, शाकीर उमर शेख, तकिया उमर शेख, रफिक उमर शेख, फारुख उमर शेख व फारुख उमर शेख यांचा मुलगा (नाव माहीत नाही) सर्व डोंगरगाव येथील रहिवासी आहेत.डोंगरगाव येथे १४ ऑगस्ट रोजी शिवारातील गट क्र.  ३१३ मधील गावठाण वादग्रस्त जागेच्या मालकी हक्काच्या कारणावरून दलित आणि मुस्लिम या दोन गटांत लाठ्याकाठ्या, दगडांनी तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात मुस्लिम लोकांनी दलित समाजाच्या अमोल अशोक दांडगे, इंदुमती अशोक दांडगे, वैशाली अशोक दांडगे, उषा अशोक दांडगे यांना बेदम मारहाण केली होती. जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तर अमोल याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी उपचार सुरू असताना अमोलचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी कलम ३२४, ३२३, १४३, १४८, १४९, ५०४, ५०६, अ.जा.प्र.अ.नुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्या नंतर अमोलची प्रकृती चिंताजनक असल्याने ३०७ कलम वाढवण्यात आली आणि बुधवारी सकाळी ८.४५ वाजता अमोलचा मृत्यू झाल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दुपारी 8 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला.काय होता वादडोंगरगाव येथील गावठाण जमिनीवर १५ बाय ६० फूट जागेवर येथील दलित व मुस्लिम समाजाचा जागेच्या ताब्यावरून वाद सुरू होता. यापूर्वी सन २०१४ मध्ये पण या जागेच्याच वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात इंदुबाई यांच्या तक्रारीवरून व फातेमा उमर शेख यांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपी इसाक उमर शेख यांनी सिल्लोड न्यायालयात मनाई हुकूमचा दावा दाखल केला आहे. अजून हा वाद न्यायप्रविष्ट आहे.यापूर्वीही आरोपीवर अॅट्रॉसिटी दाखल होतासदर खून करणाऱ्या 8 आरोपींवर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात २२ फेब्रुवारी १६ रोजी विनयभंग, मारहाण, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा राग अनावर झाल्याने या वेळी दलित कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या वादाचा शेवट अमोलच्या हत्येनं झाला. डोंगरगाव येथे पोलीस बंदोबस्त तैनातडोंगरगाव येथील एका दलित युवकाचा खून झाल्याने गावात तणावपूर्ण शांतता असल्याने या गावात १ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ फौजदार, ५७ पोलीस कर्मचारी, १५ होम गार्ड, आरसीपीची एक तुकडी तैनात करण्यात आलीआहे. या परिस्थितीवर वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. डी. मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे लक्ष ठेवून आहेत. गावात तणावपूर्ण शांतता आहे.