शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अवघी मुंबापुरी झाली पंढरी!

By admin | Updated: July 5, 2017 07:05 IST

आषाढी एकादशीनिमित्ताने विठूच्या गजरात दंग झालेल्या मुंबईकरांमुळे मंगळवारी मुंबापुरीला पंढरीची शोभा आली होती. शाळा, महाविद्यालयांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आषाढी एकादशीनिमित्ताने विठूच्या गजरात दंग झालेल्या मुंबईकरांमुळे मंगळवारी मुंबापुरीला पंढरीची शोभा आली होती. शाळा, महाविद्यालयांपासून कामगारवर्गापर्यंत प्रत्येकाने समाजप्रबोधनासाठी काढलेल्या दिंड्यांमुळे संपूर्ण मुंबईत माउलीचाच जयघोष ऐकू आला.वृक्षलागवड, स्वच्छता, पर्यावरण असे विविध विषय हाती घेऊन वारकरी संप्रदायासोबत माळकरी आणि टाळकरी विद्यार्थीही दिंड्यांमध्ये सामील झाले होते. दरम्यान, नयनरम्य पालखी सोहळ्यांनी मुंबईकरांचे डोळे दिपले. प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिराबाहेर तर हजारो वारकऱ्यांसह शेकडो दिंंड्या येऊन धडकल्या. राम कृष्ण हरीच्या जयघोषात टाळ-मृदंगामुळे वातावरणात हरिनामाचाच गजर ऐकू येत होता. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी स्टॉल लावले होते. दक्षिण मुंबईतील कापड बाजारातील गुमास्ता कामगार युनियननेही मंगलदास मार्केटपासून नजीकच्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढत सर्वांचेच लक्ष वेधले. ग्राहकांना साडी दाखवणाऱ्या गुमास्ता कामगारांच्या हाती टाळ पाहून काही व्यापारीही दिंडीमध्ये सामील झाले होते. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि कोकण भागातील कामगार मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या वारीची परंपरा जपत असल्याचे युनियनचे संपतराव चोरगे यांनी सांगितले.‘एमडी’मध्ये ‘विठूचा गजर’!परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ‘विठूचा गजर’ या संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी अनुभवायला मिळाली. मराठी वाङ्मय मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वारकरी संप्रदायाचे महत्त्व व संत परंपरेचे दर्शन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून घडवण्यात आले. उपस्थित गायकांनी संत साहित्याचा संगीतमय प्रवास सादर केला. कोणत्याही धर्माचा, जातीचा, लिंगाचा माणूस वारकरी किंवा माळकरी होऊ शकतो ही संतांची शिकवण विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. वृक्षारोपण दिंडीला नामस्मरण दिंडीची साथमालाड येथील विदर्भ विद्या मंदिर, आई फाउंडेशन आणि शिल्पकार कला मंच यांनी संयुक्त विद्यमाने विदर्भ विद्या मंदिर शाळेपासून संतोषी माता मंदिर व विठ्ठल मंदिराला वळसा घालून शाळेच्या परिसरात दिंडीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, नामस्मरण दिंडी आणि वृक्षारोपण दिंडी काढण्यात आली. वृक्षारोपण दिंडीच्या माध्यमातून लोकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्यात आले. सामाजिक जाणिवेत रंगले बालवारकरी! आषाढी एकादशीच्या निमित्ताने कुर्ला येथील डी.एस. शिक्षण संस्थेतर्फे या परिसरात लहान मुलांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पर्यावरणच नव्हे; तर नेत्रदान, रक्तदान आणि सुरक्षा याबद्दलची जनजागृती या वेळी केली गेली. ‘बेटी बचाओ; बेटी पढाओ’ याविषयीचे फलक दिंडीत सामील झालेल्या मुलांनी हाती धरले होते. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या भक्तिप्रद अभंगाची ओळख या वेळी संबंधित शिक्षकांनी मुलांना करून दिली. विठ्ठल आणि रखुमाईची वेशभूषा; तसेच वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा दिंडीतल्या मुलांनी केली होती.बोरीवलीत उभारली पंढरीची वारी!बोरीवलीतील बीमानगर एज्युकेशन सोसायटीने शाळेपासून एक्सर येथील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडीचे आयोजन केले होते. गेल्या ३२ वर्षांपासून दिंडीची परंपरा कायम राखणाऱ्या या शाळेच्या यंदाच्या मिरवणुकीत विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिकृती असलेल्या पारंपरिक चित्ररथाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या वेळी अभंग, भजन, संगीत आणि गायनाने वारकरी मंडळीही विठूमय झाली. मिरवणुकीत सामील झालेल्या ५० मुलांच्या लेझीम पथकाला ढोल पथकाने लयबद्ध साथ दिली. दरम्यान, भगवी पताका हाती घेऊन नाचणारे पारंपरिक वेशातील छोटे वारकरी आणि माउलींच्या पालखीने बोरीवलीत पंढरीचे दृश्य उभे केले होते. शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी या वेळी उपस्थिती लावली.भांडुपमध्ये  पर्यावरण दिंडी भांडुप पश्चिमेकडील नरदास नगरच्या श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी पर्यावरण दिंडी काढत सर्वांचेच लक्ष वेधले. या दिंडीत पूर्व प्राथमिक विभागातील सहावी व सातवी इयत्तेचे आणि निसर्ग मंडळातील सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सामील झाले होते. सुंदर पालखीसह विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थी दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. दिंडीत शाळेचे संचालक वसंत सावंत, संचालिका वर्षा सावंत, मुख्याध्यापिका छाया कुरकुटे, उपमुख्याध्यापिका प्रविणा देऊलकर, पर्यवेक्षिका सुनीता गोळे यांनीही सहभाग घेतला.स्वच्छता व पर्यावरणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा व फलकाद्वारे या वेळी लोकांमध्ये जनजागृतीही केली. दरम्यान, सकाळी विद्यार्थ्यांना पर्यावरण व आषाढी एकादशीचे महत्त्व परिपाठात सांगण्यात आले.अंधेरीत वृक्ष दिंडी अंधेरी पूर्व येथील परांजपे विद्यालय माध्यमिक शाळेने आषाढी एकादिशीनिमित्त वृक्ष दिंडी काढली होती. शाळेतील विद्यार्थी मंडळ, निसर्ग मंडळ, विज्ञान मंडळ, मराठी वाङ्मय मंडळ अशा सर्व मंडळांनी दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपन केले. ही सर्व मंडळे मिळून वर्षभर वृक्षांची निगा राखतात. त्याचबरोबरीने निसर्ग आणि झाडांविषयी जनजागृती करण्यासाठी वृक्ष दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत अंधेरी पोलीस स्टेशनचे घोळवे, उप पोलीस निरीक्षक तसेच सहकारी गावडे, शाळेचे मुख्याध्यापक गणपत हाक्के आणि शिक्षक अमले व शिक्षिका शिर्के उपस्थित होते. ही दिंडी विजयनगर सोसायटी ते सहार रोड अशी फिरवून शाळेत परतली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरण वारीचा समारोपमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी सुरू केलेल्या ‘पर्यावरण वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी अमृता फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, माजी मंत्री एकनाथ खडसे, बबनराव पाचपुते, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक टाळ-मृदंगाच्या गजरात ठेका धरत हरिनामाचा गजर केला.चुनाभट्टीत रिंगण अनुभव! : चुनाभट्टी शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक सावित्रीबाई फुले शाळा तसेच माध्यमिक विद्या विकास हायस्कूलने वारकरी दिंडीचे आयोजन सोमवारी केले होते. विद्यार्थ्यांना वारी आणि वारकरी तसेच दिंडीतून केलेला हरिनामाचा गजर, रिंगण याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन केले होते. संस्थेचे सचिव अनंत पाटील यांची ही संकल्पना होती. मुख्याध्यापक परदेशी आणि दुखंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.