शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

साथी थोपवण्यासाठी पालिका सज्ज

By admin | Updated: August 25, 2016 02:11 IST

गणेशोत्सवास लवकरच प्रारंभ होणार असून, पाठोपाठ इतरही सण, उत्सव साजरे होणार आहेत.

मुंबई : गणेशोत्सवास लवकरच प्रारंभ होणार असून, पाठोपाठ इतरही सण, उत्सव साजरे होणार आहेत. या कालावधीत साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून आरोग्य जनजागृती शिबिरे मोठया प्रमाणात आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापौर निवास येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत प्रशासनाने ही माहिती दिली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सर्व कामांचा आढावा घेतला. पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी, प्रभावी पद्धतीने सर्व भागांत जनजागृतीचे उपक्रम हाती घ्यावेत, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत प्रशासनाला दिले. लोकप्रतिनिधी, नागरिक व त्या-त्या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांचा जनजागृती उपक्रमांमध्ये सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. प्रत्येक सोसायटीत आरोग्यविषयक भित्तिपत्रके प्रदर्शित करण्यात यावीत. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मोबाइल व्हॅन सुरू करून जनजागृती करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.महानगरांतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा होत असताना, महापालिका व इतर प्राधिकरण यांनी संयुक्त बैठक घेऊन, गणेश आगमनांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले, तसेच सागरी किनारी रस्ता (कोस्टल रोड) सध्याची स्थिती व त्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा या वेळी आढावा घेण्यात आला. पावसाळ्यानंतर लवकरच सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असून, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय नूतनीकरणाच्या कामालाही गती देण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)