शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका अभियंत्यांनी वाचवले १६०० कोटी

By admin | Updated: January 21, 2017 03:04 IST

रस्ते, कचरा, नालेसफाई अशा घोटाळ्यांत अभियंत्यांचे नाव पुढे आले होते.

मुंबई : रस्ते, कचरा, नालेसफाई अशा घोटाळ्यांत अभियंत्यांचे नाव पुढे आले होते. त्यामुळे समस्त अभियंता वर्गाकडे संशयाने पहिले जात आहे. मात्र विकास नियोजन विभागाच्या दोन अभियंत्यांनी सतर्कता आणि चिकाटीने पाठपुरावा करत पालिकेचे १६०० कोटींचे भूखंड वाचवले आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळे विलेपार्लेतील जेव्हीपीडी स्कीममधील १४ आरक्षित भूखंड महापालिकेला फुकटात मिळणार आहेत.सन २०१०मध्ये तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव यांच्या कारकिर्दीत विलेपार्ले जेव्हीपीडी स्कीममधील १४ आरक्षित भूखंडांची खरेदी सूचना जेव्हीपीडी को-आॅप. हाउसिंग असोसिएशनतर्फे महापालिकेवर बजावण्यात आल्या होत्या. जेव्हीपीडीतील जागा ही म्हाडाच्या मालकीची होती. सन १९६०मध्ये म्हाडाने हे भूखंड जेव्हीपीडीला विकले. खरेदी सूचनेला उत्तर देत हे भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, या खरेदी सूचनेवर त्वरित पावले उचलण्यात त्या वेळी विलंब झाला होता. त्या वेळी हे प्रकरण गाजले होते. विरोधी पक्ष नेत्यांसह सत्ताधारी पक्षांनी महापौरांवर आरोप करून या खरेदी सूचना मंजूर करण्यास भाग पाडले होते. आरक्षित भूखंडाचे हे प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी केल्यानंतर म्हाडा व जेव्हीपीडी असोसिएशनच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यामध्ये म्हाडा हे मूळ मालक असल्यामुळे खरेदी करणाऱ्या जेव्हीपीडीला अशा प्रकारे खरेदी सूचना बजावण्याचा अधिकारच नाही, असे समोर आणले. यामुळे खरेदी सूचनासाठी मंजूर करण्यात आलेले १६०० कोटी रुपये देण्याची गरज नाही. त्यामुळे महापालिकेचे १६०० कोटी रुपये वाचले आहेत. (प्रतिनिधी)>विक्री करण्याचा अधिकारविकास नियोजन आराखड्यात नागरी सुविधांसाठी भूखंड आरक्षित करण्यात येतात. हे आरक्षण नियमानुसार १० वर्षांनंतर उठते. त्या वेळी त्या भूखंडाचा मालक खरेदी सूचना बजावत असतो. महापालिका त्या कालावधीत खरेदी सूचनेनुसार संबंधित जमीन मालकाला त्याचा मोबदला देत भूखंडाचा ताबा घेऊ शकते. मात्र त्या मुदतीत महापालिकेने पावले उचलली नाहीत, तर मालकाला बाजारभावाने ती जमीन विकता येते. मात्र जेव्हीपीडीचे भूखंड म्हाडाच्या मालकीचे असल्याने जेव्हीपीडी असोसिएशनला त्याची विक्री करण्याचा अधिकार नाही, हे निदर्शनास आले. >अधिकाऱ्यांचे कौतुक सतर्कतेने ही बाब उघडकीस आणून हे भूखंड म्हाडाचे असल्याचे नियोजन विभागाचे डेनियल कांबळे आणि एस. व्ही. आर्वीकर यांनी समोर आणले. त्यांच्या या दक्षतेचे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी कौतुक केले आहे.