पुणे : महापालिकेने कोटयवधी रुपयांची अद्ययावत रुग्णालये उभारली. परंतु, रुग्णालयासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व सेवक नसल्याने त्यांची दुरावस्था आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना उपचारापासून वंचित राहवे लागत आहे. खासगी हॉस्पीटलला ही रुग्णालये चालविण्यास देण्याऐवजी महापालिका व राज्य शासन असे संयुक्त विद्यमाने ती चालविण्यास द्यावीत. त्यामुळे महापालिकेचे अर्थिक नुकसान कमी होवून गोरगरीब नागरिकांना माफक दरात उपचार घेता येतील, अशी मागणी स्थायी समिती सदस्य पृथ्वीराज सुतार यांनी आज केली. महापालिकेने आर-७ नुसार बोपोडी व खराडी येथे बहुमजली रुग्णालय उभारली आहेत. मात्र, पुरेसा सेवक नसल्याने संबंधित रुग्णालये खासगी हॉस्पीटलच्या घश्यात घालण्याचा डाव सुरू आहे. त्यासाठी राजकीय वरदहस्त असून, त्यामागे महापालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारी दिले. ही दोन्ही रुग्णालये भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर पुढे आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालये महापालिका व शासनाने संयुक्त विद्यमाने चालविण्याची मागणी सुतार यांनी केली आहे.
महापालिकेची रुग्णालये शासनाने चालवावित
By admin | Updated: May 9, 2014 21:40 IST