शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका ‘अ’ श्रेणीत

By admin | Updated: September 2, 2014 01:12 IST

राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नागपूर शहराचा ‘अ’ श्रेणी महापालिकांत समावेश केला आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दर्जा वाढल्याने आता महापौरांच्या गाडीवर लाल दिवा (विनाफ्लॅश) तर

नागपूरचा दर्जा वाढला : विशेष बाब म्हणून ‘समावेशनागपूर : राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नागपूर शहराचा ‘अ’ श्रेणी महापालिकांत समावेश केला आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दर्जा वाढल्याने आता महापौरांच्या गाडीवर लाल दिवा (विनाफ्लॅश) तर आयुक्तांच्या गाडीवर के सरी दिवा (फ्लॅशसह) लागणार आहे. नागपूर महापालिकेचा ‘ब’ वर्ग महापालिकांत समावेश होता. दर्जा वाढल्याने शहराची प्रतिष्ठा वाढली आहे. परंतु यामुळे केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात कपात होण्याची शक्यता आहे. आजवर ‘ब’ दर्जामुळे नागपूर महापालिकेला जेएनएनयूआरएम योजनांत ३० टक्के निधी द्यावा लागत होता. ‘अ’ दर्जा झाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या योजनात मनपाचा वाटा वाढण्याची शक्यता आहे. शहराचा दर्जा वाढविण्यात आला. परंतु का वाढविला, याचा शासन अध्यादेशात उल्लेख नाही. उपराजधानीचे शहर असल्याने विशेष बाब म्हणून दर्जा वाढविण्यात आल्याची चर्चा आहे. वास्तविक दरडोई उत्पन्नाचा विचार करता, यात नागपूर इतर शहरांच्या तुलनेत मागे आहे. दर्जा वाढल्याचा लाभ केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे.(प्रतिनिधी) सुविधा मिळणारनागपूर शहराला ‘अ’ दर्जा मिळाल्याने शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. शहर विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयुक्त श्याम वर्धने यांनी व्यक्त केला.