शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

मुंबईचे नाले गाळात

By admin | Updated: April 28, 2017 02:48 IST

ठेकेदारांच्या प्रतीक्षेत नाल्यांची सफाई १५ दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे अद्याप १९ टक्केच नाले साफ झाले आहेत. तर मिठी नदीचे

मुंबई : ठेकेदारांच्या प्रतीक्षेत नाल्यांची सफाई १५ दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे अद्याप १९ टक्केच नाले साफ झाले आहेत. तर मिठी नदीचे १४ टक्के काम झाले आहे. परंतु मिठी नदीचा प्रवाह असलेल्या पश्चिम उपनगरात अद्याप सफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के तर पावसाळ्यानंतर २० टक्के नाल्यांची सफाई करण्यात येते. मात्र नालेसफाई घोटाळ्यात दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई झाल्यामुळे नवीन ठेकेदार पुढे येण्यास तयार नव्हते. तसेच गाळ टाकण्यासाठी जागा मिळत नसल्याने ठेकेदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पावसाळ्यापूर्व कामांसाठी पालिका प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना विभागस्तरावरील कामगार व बिगर शासकीय संस्थांमार्फत छोट्या नाल्यांची सफाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभाग पातळीवर मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांची कामे १ एप्रिलपासून तर छोट्या नाल्यांची कामे ७ एप्रिलपासून सुरू झाली. मोठ्या नाल्यांच्या सफाईचे कंत्राट गेल्याच आठवड्यात देण्यात आले. त्यानुसार काही ठिकाणी धिम्या गतीने गाळ काढण्यास सुरुवात होत आहे. मात्र आठवड्यानंतरही यात काही फारसा बदल झालेला नाही. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात १३ टक्के, पश्चिम उपनगरात २१, पूर्व उपनगरत १७ असे एकूण १९ टक्के नाल्यांचे काम झाले आहे. एप्रिल महिना संपण्यास अवघे चार दिवस उरले आहेत. मात्र अशा संथ कामामुळे नाल्यांमध्ये गाळ पडून असल्याने ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. (प्रतिनिधी)असा होता नालेसफाईचा घोटाळा -नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे २०१५मध्ये उजेडात आले. या प्रकरणी स्थापन चौकशी समितीने नालेसफाईच्या कामात अनियमितता, गाळ वाहून नेण्यात घोटाळा आणि गाळ टाकण्यासाठी दिलेल्या कचराभूमीचे ना हरकत प्रमाणपत्रही बोगस असल्याचे आढळून आले. या प्रकरणी १४ अधिकाऱ्यांचे निलंबन आणि सात ठेकेदारांवर फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. मिठी नदी गाळातच : मिठी नदीने २००५मध्ये मुंबईला मगरमिठीत घेतले होते. त्यामुळे मिठी नदीने पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडली की मुंबईचा जीव मुठीत येतो. हा धोका टाळण्यासाठी मिठी नदीच्या सफाईकडे विशेष लक्ष दरवर्षी देण्यात येते. मात्र या वेळेस मिठी नदीची सफाई संथगतीने सुरू आहे. पश्चिम उपनगरातील मिठी नदीच्या प्रवाहाची सफाईही सुरू झालेली नाही. यामुळे पावसाळ्यात मिठी नदी डोकेदुखीचे कारण ठरणार आहे.