शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईची आगेकूच

By admin | Updated: March 6, 2017 02:40 IST

ओशिवरा, पोईसर, दहिसर आणि मिठी मुंबईतल्या चार प्रमुख नद्या; मात्र सद्यस्थितीमध्ये या चारही नद्यांची अवस्था वाईट झाली आहे.

सागर नेवरेकर,मुंबई- ओशिवरा, पोईसर, दहिसर आणि मिठी मुंबईतल्या चार प्रमुख नद्या; मात्र सद्यस्थितीमध्ये या चारही नद्यांची अवस्था वाईट झाली आहे. रसायन मिश्रित सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जात असून, नद्या ‘मृत’ होत आहेत. परिणामी ‘मृत’ नद्यांना वाचवण्यासाठी ‘रिव्हर मार्च’ने मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे या मोहीमेला जलपुरुष राजेंद्र सिंह यांनीही हात दिला आहे. आणि याच निमित्ताने रविवारी सकाळी पोईसर नदीच्या संवर्धनासाठी राजेंद्र सिंह दाखल झाल्यानंतर एकत्र आलेल्या मुंबईकरांनी नद्यांच्या संवर्धनासाठी आगेकुच केली.‘रिव्हर उत्सव’ या मोहीमेतंर्गत रविवारी सकाळी ७.३० वाजता जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. महावीर नगर, कांदिवली व्हिलेज, पारेख नगर, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, एस.व्ही रोड, हिरानंदानी हेरीटेज आणि पोईसर जिमखाना या मार्गावरून रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीत लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते. दहा शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवत नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले.राजेंद्र सिंह यांनी यावेळी रॅलीला संबोधले. ते म्हणाले, नदी ही आपली आई आहे. ती आजारी पडली आहे. आपली पोईसर नदी ही आयसीयूमध्ये आहे. तिच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. समाज आणि सरकार जेव्हा एकत्र येईल तेव्हा नदीची स्थिती सुधारेल. आपण नदीला बांधून ठेवू शकत नाही. जर आपण बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला याचा भविष्यात वाईट परिणाम होऊ शकतो. नद्यांचे काँक्रिटायझेशन झाले आहे. त्यामुळे नदीचे उगम स्त्रोत हे बंद होतात. पोईसर नदीचे काँक्रिटायझेशन करून तिला नाला बनवले जात आहे. नदीची बिकट अवस्था झाली आहे. >नदीचे हत्यारे हे आपल्या अवतीभवती आहेत. त्यांना रोखले पाहिजे. नदी आपल्याला विनंती करत आहे की ‘तुम्ही मला दुषित करू नका मला देखील जगु द्या.’ मला तुमच्या सर्वांचे या कारणामुळे कौतुक करावेसे वाटते की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालात. आणि प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की पोईसर नदी ही आपली आहे.- राजेंद्र सिंह, जलपुरुष