शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘बेस्ट’च्या तोट्याचा मुंबईकरांना भुर्दंड

By admin | Updated: May 18, 2016 05:06 IST

वाहतूक विभाग आर्थिक संकटात असल्याने बेस्टने बचावाचे चार पर्याय सुचविले आहे़

मुंबई : वाहतूक तूट शुल्क रद्द करण्याची घोषणा भाजपाने केली खरी़ मात्र वाहतूक विभाग आर्थिक संकटात असल्याने बेस्टने बचावाचे चार पर्याय सुचविले आहे़ यामध्ये मालमत्ता करावर उपकर, वीज दरवाढ असे पर्याय आहे़ एकीकडे वाहतूक तूट रद्द होत असताना पुन्हा मुंबईकरांच्या खिशातच हात घालण्याची तयारी बेस्टने सुरू केली आहे़वाहतूक विभागाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने वीज ग्राहकांकडून वाहतूक तूट वसुली म्हणजेच टीडीएलआर वसूल करण्यास सुरुवात केली़ हा भुर्दंड गेले अनेक वर्षे शहर भागातील १० लाख वीज ग्राहक उचलत आहेत़ बेस्ट समिती ताब्यात येताच भाजपाने हा कर रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली़ मात्र आर्थिक संकट तरीही कायम असल्याने बेस्ट प्रशासनाने चार पर्याय तयार ठेवले आहेत़ यातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुन्हा मुंबईकरांवर दरवाढीची टांगती तलवार आहे़ टीडीएलआर काढल्यानंतरही वाहतूक विभागाची तूट ९०० कोटी रुपयांपर्यंत जात आहे़ त्यामुळे बेस्टचा डोलारा कसा सावरणार, असा प्रश्न बेस्ट समिती सदस्यांनी आज उपस्थित केला़ यावर उत्तर देताना, महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी चार नवीन पर्याय सुचविले़ यामध्ये मुंबईतील मालमत्तांवर उपकर आकारणे, संपूर्ण मुंबईकरांवर समान कर, वीज दरवाढ आणि राज्य सरकारकडून सबसिडी मिळवणे, बेस्टच्या तीनशे एकर जागेचा विकास करणे या पर्यायांचा समावेश आहे़ ।६५० कोटींवर पाणी : कुलाबा ते सायन, चर्चगेट ते माहीम या शहर भागातील १० लाख ग्राहकांना बेस्ट वीजपुरवठा करीत आहे़ या ग्राहकांना वीज बिलांतून वाहतूक तूट शुल्कही आकारण्यात येत होते़ याद्वारे बेस्ट उपक्रमाला सुमारे ६५० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे़ हा महसूल ३१ मार्च रोजी बंद झाल्यामुळे बेस्टचे आर्थिक नुकसान वाढले आहे़