शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद

By admin | Updated: August 1, 2016 02:10 IST

मागील आठवड्याभरापासून शहर आणि उपनगरात अधून-मधून कोसळणाऱ्या जलधारांनी रविवारी सकाळी मात्र रौद्र रुप धारण केले.

मुंबई : मागील आठवड्याभरापासून शहर आणि उपनगरात अधून-मधून कोसळणाऱ्या जलधारांनी रविवारी सकाळी मात्र रौद्र रुप धारण केले. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी आणि दुपारी कोसळलेल्या जलधारांनी मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले असले तरी ऐन रविवारीचा मुहूर्त साधत कोसळलेल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईने चौपाटयांवर केलेल्या गर्दीमुळे मुंबईकरांचा मान्सून आनंद ओसंडून वाहत होता.रविवारी सकाळी समुद्राला भरती असतानाच मुंबईत पावसाची दमदार हजेरी लागली. जोरदार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर विपरित परिणाम होत असतानाच ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत होत्या. मात्र असे असतानाच ऐन रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मनमुराद कोसळणाऱ्या पावसात तरुणाई चिंब भिजली. दुपारनंतर पावसाचा वेग कमी झाल्याने सायंकाळपर्यंत मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटीसह वर्सोव्याच्या समुद्र किनारी पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. समुद्र किनारी उसळणाऱ्या लाटा, वेगाने वाहणारा वारा, पावसाचे टपोरे थेंब; अशा रविवारच्या मुक्त वातावरणाला तरुणाई सामोरे गेली. (प्रतिनिधी)>सरी झेलण्यास रस्त्यांवर मुक्तसंचारसमुद्राच्या लाटा अंगावर झेलत तरुणांनी गरमागरम चहा, कांदाभजी आणि भुट्टा यासारख्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. मरिन ड्राइव्ह येथे तरुणाईने चिंब भिजण्यासाठी गर्दी केली असतानाच गिरगाव आणि जुहू चौपाटीवर कौटूंबिक गर्दीचा आनंद ओसंडून वाहत होता. समुद्रावर गर्दी वाढत असतानाच शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात फुटबॉलसह क्रिकेटचा खेळ रंगला होता. तर दुसरीकडे रस्त्यावर पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबाना अंगावर झेलण्यासाठी मुंबईकरांचा मुक्तसंचार सुरु होता.दरम्यान, ऐन रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत मुंबईकरांनी मान्सून पिकनिकचा बेत आखल्याचे चित्र होते. त्यामुळे मुंबईबाहेरील मान्सून पिकनिक स्पॉटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गर्दीला उधाण आले होते. परिणामी शनिवारी रात्रीपासून सुरु झालेला हा मान्सून पिकनिकचा मूड रविवारच्या रात्रीपर्यंत कायम असल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे येत्या ४८ तासांत शहर आणि उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.