शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, सुरक्षारक्षक ठेवताना सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:40 IST

इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेला सुरक्षारक्षकच चोर बनत असल्याचे नवघर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले. या सुरक्षारक्षकांची टोळीच असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मुंबई : इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेला सुरक्षारक्षकच चोर बनत असल्याचे नवघर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले. या सुरक्षारक्षकांची टोळीच असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामध्ये वृद्ध असल्याचा फायदा उठवून सुरक्षारक्षकाची नोकरी मिळवायची. त्यानंतर १५ ते २० दिवस काम करून झाल्यानंतर अन्य साथीदारांच्या मदतीने इमारतीतील बंद घराची घरफोडी करून पसार व्हायचे अशी त्यांची कार्यपद्धती. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशाच टोळीतील दुकलीला नवघर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मुंबईत अशा प्रकारे १४हून अधिक गुन्हे दाखल आहेत.मुलुंड पूर्वेकडील शिल्पी सोसायटीत बँक मॅनेजर असलेले नंदकुमार राणे (५८) त्यांच्या पत्नीसह राहतात. १४ जून रोजी ते कामावर गेले असताना घरातून दागिन्यांसह ९ लाख ८६ हजार किमतीचा ऐवज चोरीला गेला. याबाबत नवघर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. तपासात इमारतीचा वृद्ध सुरक्षारक्षक संतोष कुमार आणि त्याचा मुलगा अजित गायब असल्याचे समोर आले. त्यांची माहिती गोळा करताना परिसरातील वडापाववाल्याच्या फोनवरून संतोषने फोन केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या मोबाइल क्रमांकावरून शोध सुरू केला. तेव्हा त्यांची ओळख पटली. ते उत्तर प्रदेशातील असून, त्यांची नावे गौरीशंकर चौरसिया व विकास उर्फ राजा अनिल सिंग अशी होती. दोघांनाही अटक करत त्यांच्याकडून ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सुरक्षारक्षक नेमताना काळजी घ्या...-सुरक्षारक्षकाची संपूर्ण माहिती घेऊनच त्याला नोकरीस ठेवावे. त्याच्या वागणुकीत संशय आल्यास त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा. विशेषत: वृद्ध सुरक्षारक्षक नेमताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.विकासविरुद्ध १४ गुन्हे : विकासविरुद्ध डी.एन. नगर, कांदिवली, गोरेगाव, ओशिवारा येथील घरफोडीच्या गुन्ह्यांत त्याचा शोध सुरू आहे. तर तपासात विलेपार्ले, गोरेगाव, कांदिवली, डी.एन. नगर परिसरात त्याने १४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे.