शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

मुंबईकरांच्या आरोग्यावर ११५ नगरसेवक, ४ आमदारांचे मौन

By admin | Updated: July 7, 2016 21:27 IST

वेगवेगळी वक्तव्ये करून चर्चेत राहणारे मुंबईतील नगरसेवक आणि आमदार मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मात्र मौनीबाबा झाले आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ७ : वेगवेगळी वक्तव्ये करून चर्चेत राहणारे मुंबईतील नगरसेवक आणि आमदार मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मात्र मौनीबाबा झाले आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईतील ११५ नगरसेवकांनी महापालिका सभागृहात तर चार आमदारांनी २०१४ हिवाळी अधिवेशन व २०१५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईकरांच्या आरोग्याबाबत एकही प्रश्न विचारला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात ही माहिती उघड केली आहे. मुंबई महापालिकेत मुंबईकरांनी एकूण २२७ नगरसेवक निवडून दिलेले आहेत. मात्र त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ११५ नगरसेवकांनी महापालिका सभागृहात आरोग्याबाबत एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या वर्षभराच्या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. तर उरलेल्या ११२ नगरसेवकांनी आरोग्याबाबत ४१२ प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य समितीमध्ये असलेल्या ३६ नगरसेवकांमधील चार नगरसेवकांनीही मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मौन बाळगल्याची माहिती आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी गेल्या वर्षभरात आरोग्याबाबत महापालिका सभागृहात सर्वाधिक म्हणजेच ५७ प्रश्न उपस्थित केले आहेत.

विधानसभेतही मुंबईतील चार मंत्री वगळल्यास उरलेल्या ३२ आमदारांपैकी ४ आमदारांनी आरोग्याबाबत मौनीबाबाची भूमिका घेतल्याचे दिसते. या चार मौनीबाबांमध्ये आमदार रमेश लटके, आमदार राम कदम, आमदार तृप्ती सावंत, आमदार तमिल सेल्वन यांचा समावेश आहे. याउलट अधिवेशन काळात दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी आरोग्याबाबत सर्वाधिक म्हणजेच ६६ प्रश्न विचारले आहेत.