शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘पॅलेस आॅन व्हिल्स’मध्ये आता मुंबई-शिर्डी सेवा

By admin | Updated: August 27, 2014 04:17 IST

पॅलेस आॅन व्हिल्स’ अशी ओळख असणाऱ्या डेक्कन ओडीसीच्या टूरमध्ये आता मुंबई-शिर्डी या नव्या पर्यटनस्थळाची भर पडली आहे.

मुंबई : ‘पॅलेस आॅन व्हिल्स’ अशी ओळख असणाऱ्या डेक्कन ओडीसीच्या टूरमध्ये आता मुंबई-शिर्डी या नव्या पर्यटनस्थळाची भर पडली आहे. त्यासह गुजरातचाही समावेश यात करण्यात आला आहे. एमटीडीसीकडून (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) आॅक्टोबर २0१४ पासून ही गाडी चालवण्यात येणार असून त्यासाठी कॉक्स अ‍ॅन्ड किंग्ज लिमिटेड आऊटसोर्स पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत नविन टूरची आणि भागिदाराची माहीती एमटीडीसीकडून देण्यात आली. २00४ साली राजेशाही थाट असलेली डेक्कन ओडीसी ट्रेन सुरु करण्यात आली. राज्यातील अनेक पर्यटनस्थळांचे दर्शन घडवताना भारतासह जगभरातील पर्यटकांना या ट्रेनने आकर्षित केले आहे. आॅक्टोबर ते एप्रिल-मे पर्यंत धावणारी ही ट्रेन आता २0१४ च्या आॅक्टोबरमध्ये नव्या भागिदारासह सामिल होत आहे. सध्या भारतात पाच डेक्कन ओडीसी असून यात एक ट्रेन महाराष्ट्रासाठी धावते. २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी या ट्रेनकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे सुरुवातीला २५ फेऱ्या होत असतानाच मुंबई हल्ल्यानंतर साधारण १५ फेऱ्याच होऊ लागल्या. पर्यटकांनी फिरवलेली पाठ, डेक्कन ओडीसीचा वाढत जाणारा खर्च यामुळे डेक्कन ओडीसी ट्रेन बंद पडते की काय अशी चर्चा मध्यंतरी रंगली. मात्र एमटीडीसीने ताज कंपनीशी असलेला जुना करार संपताच आता नवीन भागिदारासह ही ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबई-शिर्डी-मुंबई अशी सोल क्वेस्ट ही तीन दिवसाची टूर असणार आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या पर्यटकांचा ओढा पाहता या नविन टूरचा समावेश करण्यात आल्याचे एमटीडीसीच्या महाव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिडन ट्रेझर्स आॅफ गुजरात अशी आठ दिवस सात रात्रीची नविन टूरही आखण्यात आली असून वडोदरा, पालिठाणा, सासण, गीर,कच्छचे छोटे रण, पाट, अहमदाबाद आणि दिल्लीचे पर्यटन दाखवण्यात येणार आहे.