शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

मुंबईला ‘निलोफर’चा धोका नाही; मात्र पाऊस पडणार !

By admin | Updated: October 28, 2014 01:46 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर या चक्रीवादळाचा मुंबईसह राज्याला धोका नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर या चक्रीवादळाचा मुंबईसह राज्याला धोका नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र हेच सांगताना पुढील चार दिवस निलोफरचा विपरीत परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी जलधारा कोसळतील, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रूपांतर चक्रीवादळात झाले असून, पुढील 24 तासांत या चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीर्पयत होईल आणि त्यानंतर ते आखातच्या दिशेने पुढे सरकेल, असे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शिवाय मुंबई आणि महाराष्ट्राला या  चक्रीवादळाचा धोका नसला तरी पुढील चार दिवस राज्यासह मुंबईवर ढगांचे साम्राज्य कायम राहील आणि रिमङिाम धारा बरसतील.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मराठवाडय़ात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण आणि गोव्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या 
काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेच किंचित घट झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)