शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

मुंबई मॅरेथॉन : भारतीय महिलांमध्ये महाराष्ट्राची ज्योती गवते अव्वल

By admin | Updated: January 15, 2017 18:39 IST

मुंबई मॅरेथॉनमधील भारतीय महिला गटात महाराष्ट्राच्या ज्योती गवतेने एकहाती वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण पटकावले.

  रोहित नाईक/ ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 -  मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात अपेक्षेप्रमाणे लष्कराच्या धावपटूंचे निर्विवाद वर्चस्व राहिले. आॅलिम्पियन खेता राम, बहादुर सिंग धोनी आणि टीएच संजित लुवांग या लष्कराच्या धावपटूंनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावर नाव कोरले. त्याचवेळी भारतीय महिला गटात महाराष्ट्राच्या ज्योती गवतेने एकहाती वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण पटकावले. तर, पश्चिम बंगालची श्यामली सिंग आणि पहिल्यांदाच मुख्य मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेली लेह-लडाखची जिगमेट डोल्मा यांना अनुक्रमे रौप व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.यंदा धावपटूंच्या कामगिरीवर हवामानाचा बराच परिणाम झाला. पुर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांची स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली. विजेत्या खेतारामने २ तास १९ मिनिटे ५१ सेकंदाची वेळ देत शर्यत पुर्ण केली. तर, बहादुर सिंग धोनीने २ तास १९ मिनिटे ५७ सेकंदाची वेळ दिली. संजित लुवांगने २ तास २१ मिनिटे १९ सेकंदाच्या वेळेसह कांस्य पटकावले. जवळजवळ ३० किमी अंतरापर्यंत तिन्ही विजेते धावपटू एकत्रित होते. मात्र नंतर खेतारामने वेग वाढवत काहीशी आघाडी मिळवली. अखेरच्या ३ किमीमध्ये धोनीने वेग वाढवताना खेतारामला गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनुभवाच्या जोरावर खेतारामने आपली आघाडी कायम राखत बाजी मारली.

महिलांध्ये महाराष्ट्राची अनुभवी धावपटू ज्योती गवातेने अपेक्षित वर्चस्व राखले. तिने २ तास ५० मिनिट ५३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवताना सहज बाजी मारली. विशेष म्हणजे द्वितीय स्थानी राहिलेल्या बंगालच्या श्यामली सिंगला तिने तब्बल १५-१६ मिनिटांनी पिछाडीवर टाकले. श्यामलीने ३ तास ८ मिनिटे ४१ सेकंदाची वेळ दिली. तर, पहिल्यांदाच मुख्य मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या जिगमेट डोल्माने लक्षवेधी कामगिरी करताना ३ तास १४ मिनिटे ३८ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना कांस्य पदक पटकावले.