शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई @ ३६.१; शुक्रवार उष्ण दिवस राहणार

By admin | Updated: April 29, 2016 06:01 IST

बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले असतानाच गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३६.१ अंश नोंदवण्यात आले आहे

मुंबई : बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले असतानाच गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३६.१ अंश नोंदवण्यात आले आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईच्या कमाल तापमानात २ अंशांची घसरण झाली असली तरी उकाडा कायम राहिल्याने मुंबईकर त्रस्त झाले होते. तापमानात चढ-उतार नोंदवण्यात येत असतानाच आता शुक्रवार (२९ एप्रिल) हा ‘उष्ण दिवस’ राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचा पारा मुंबईकरांना आणखी चटके देईल. राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत असून, आता मुंबईच्या कमाल तापमानानेही ३८ अंशावर मजल मारली आहे. त्यामुळे वाढता उन्हाळा मुंबईकरांना नकोसा झाला असून, मुंबईकरांच्या शरीराहून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत. बुधवारपासून सलग मुंबईचे तापमान वाढत असून, ३८ ते ३६ अंशादरम्यान कमाल तापमानाची नोंद होत आहे. शिवाय तापदायक ऊन, वाढता उकाडा, उष्ण वारे व वाढती आर्द्रता मुंबईकरांचा अधिकाधिक घाम काढत असून, दुपारी ४ वाजेपर्यंत पडणारे रखरखते ऊन तापदायक ठरते आहे.अरबी समुद्रावरून मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. वारे स्थिर होण्यास दुपार होत असल्याने ते तप्त होत आहेत. आर्द्रतेमध्ये चढ-उतार नोंदवण्यात येत आहे. उत्तरेकडील उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत असून, पुढील ४८ तासांसाठी मुंबईत अशीच परिस्थिती राहील, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले.>२४ तासांत मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली.२९ ते ३० एप्रिल या काळात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २९ ते ३० एप्रिल या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.