शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीत एसटी, पीएमपीएलची सेवा विस्कळीत

By admin | Updated: August 1, 2016 01:51 IST

मुळशी तालुक्यात पुणे शहरातून होत असलेली एसटी व पीएमपीएलची सेवा विस्कळीत सुरू आहे.

पुणे : मुळशी तालुक्यात पुणे शहरातून होत असलेली एसटी व पीएमपीएलची सेवा विस्कळीत सुरू आहे. गाडीत माणसांना जनावरांसारखा कोंबून प्रवास करावा लागतो. अनियमित फेऱ्या, मोडकळीस आलेल्या गाड्या पाठविल्या जातात. त्यामुळे येथून दररोज शहरात येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गाड्यांच्या नियमित फेऱ्या कराव्यात व चांगल्या गाड्या देण्याची मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुळशी तालुका हा डोंगरी व दुर्गम आहे. सामान्य माणसाला एसटी व पीएमपीएलशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेक प्रवाशांना रात्रीच्या गाड्या रद्द करण्यात येत असल्यामुळे पौड एसटी स्थानकात रात्र काढावी लागते. गाडीत जागा नसल्याने अक्षरश: कोंबून बसविले जाते. दूध व्यावसायकिांनाही मोठा त्रास होत आहे. कामगारांनाही वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे प्रवासीवर्गात संताप आहे. खिळखिळ्या झालेल्या गाड्या पाठविल्या जातात. त्यामुळे वारंवार त्या बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास होत असतो.पीएमपीएलची सेवाही अनियमित सुरू आहे. नादुरुस्त बस पाठविल्या जात असल्याने वारंवार बस जागोजागी बंद पडलेल्या असतात. त्यामुळे एसटी व पीएमपीएल प्रशासनाला निवेदन दिले असून सेवा सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे. तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे, जिल्हा दूध संघाचे संचालक रामभाऊ ठोंबरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास पायगुडे, महिला अध्यक्षा चंदा केदारी व विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सागर धुमाळ यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>विद्यार्थ्यांना फटकामुळशी तालुक्यातून शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. त्यांना वेळेवर व पुरेशा बस उपलब्ध होत नसल्याने वेळेवर पोहोचता येत नाही. कधी गाडी बंद पडली की त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सुनील चांदेरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.