शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एमटीएनएलला साडेसहा टक्के तोटा

By admin | Updated: September 5, 2016 03:33 IST

मागील तीन वर्षांपासून साडेसहा टक्के तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती खासदार राजन विचारे यांनी येथील कार्यालयात घेतलेल्या आढाव्याअंती उघड झाली.

ठाणे : केंद्र शासनाच्या नियंत्रणातील ठाण्यात कार्यरत असलेले महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) कार्यालय मागील तीन वर्षांपासून साडेसहा टक्के तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती खासदार राजन विचारे यांनी येथील कार्यालयात घेतलेल्या आढाव्याअंती उघड झाली. येथील चरई येथे कार्यरत असलेल्या एमटीएनएल कार्यालयाचा मागील तीन वर्षांचा आढावा घेण्यात आला. या कार्यालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून विचारे यांनी ही बैठक घेतली असता त्यास एमटीएनएलचे मुंबई पूर्व २ या विभागाचे उपाध्यक्ष ए.एन. उपाध्याय हे उपस्थित होते. मागील तीन वर्षांच्या वार्षिक आढाव्यातील तोट्याची कारणे मात्र संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांना या वेळी सांगता आली नाहीत. त्यामुळे महानगर टेलिफोन निगमचा कारभार ढिसाळ असल्याची नाराजी विचारे यांनी या वेळी व्यक्त केली. कोणीही विकत घेत नसलेले स्पेक्ट्रम २००८ रोजी एमटीएनएलकडे सुपूर्द करण्यात आले. परंतु, त्यासाठी झालेला नफा व बँकेचे कर्ज असे एकूण चार हजार ५०० कोटी रु पये खर्ची पडल्यानंतर ३ जी सर्व्हिस देता न आल्यामुळे सदरची रक्कम बुडीत निघाली. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या वेळी स्मार्ट फोन भरपूर महागडे असल्यामुळे एमटीएनएलचे ग्राहक ते खरेदी करू शकत नव्हते व त्याच कारणाने ३ जी सर्व्हिस लोप पावत गेली.एमटीएनएलमध्ये सुधारणा होईपर्यंत कोणीही सल्लागार समितीचे मानधन घेणार नसल्याचा ठराव या वेळी एकमताने करण्यात आला. या बैठकीस एमटीएनएलचे वरिष्ठ प्रबंधक टी.बी. भोसले, उपमहाप्रबंधक एस.पी. पाटील, जानकी रामन, सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र महाडिक, शेषराव चक्र नारायण, जितेंद्र दुबल, किरण शहा उपस्थित होते. (प्रतिनिधी)>नेटवर्कसाठी टॉवर हवेतएमटीएनएलच्या ग्राहकास नेटवर्क मिळत नसल्याची मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी ६०० बीटीएस टॉवर्र्स उभारण्याची गरज आहे.याशिवाय, या सेवेसाठी अपुरी साधनसामग्री व केंद्रीय निधीचा अभाव आदींसाठी दूरसंचार विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असून जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्यांची ताबडतोब डागडुजी करण्यासाठीदेखील या बैठकीत चर्चा झाली.