शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

महावितरणने क्षेत्रीय अभियंत्यांना डावलले?

By admin | Updated: October 4, 2016 05:05 IST

प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ऊर्जा मंत्रालयाने महावितरणचे विभाजन करून औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि कल्याण अशी चार प्रादेशिक कार्यालये स्थापन

मुंबई : प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ऊर्जा मंत्रालयाने महावितरणचे विभाजन करून औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि कल्याण अशी चार प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाआडून महावितरण प्रशासनाने मात्र वीज ग्राहक सेवेला महत्त्व देणाऱ्या क्षेत्रिय अभियंते आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांना डावलले आहे, तर औद्योेगिक संबंध विभागावर (‘आय आर’) मेहरनजर दाखविली असल्याने नाराजीचा सूर आहे.महावितरणच्या नव्या रचनेनुसार नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक म्हणून प्रसाद रेशमे यांची, तर पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या संचालकपदी संजय ताकसांडे यांची नियुक्ती करण्यात आली. औरंगाबाद आणि कल्याण प्रादेशिक कार्यालयासाठी संचालकपदी दोन आयएएस दर्जाचे अधिकारी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ऊर्जामंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयास पाठविला आहे. सध्या कल्याण कार्यालयाचा पदभार भांडुपचे मुख्य अभियंता सतीश करपे तर औरंगाबादचा कार्यभार तेथील मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रादेशिक कार्यालये करताना परिमंडल आणि त्याखालील कार्यालयांतील अभियंत्यांची पदे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे क्षेत्रिय अभियंत्यांची धावपळ वाढून त्याचा ग्राहक सेवेवर परिणाम होऊ शकतो, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.शिवाय, कधी काळी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या समकक्ष असणाऱ्या औद्योगिक संबंध अधिकाऱ्यांचे व्यवस्थापनाने भलतेच लाड पुरविले आहेत. जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अपग्रेडेशनचा प्रस्ताव असतानाही त्यास केराची टोपली दाखवली गेली आहे. (विशेष प्रतिनिधी)