शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मिसेस फडणवीस न्यूयॉर्कमध्ये करणार रॅम्प वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 08:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मॅनहॅट्टन येथे पार पडणा-या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी होणार आहेत.

- ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 8 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मॅनहॅट्टन येथे पार पडणा-या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी होणार आहेत. इतकंच नाही तर त्या रॅम्पवर उतरणार असून शो-स्टॉपर म्हणून दिसणार आहेत. या फॅशन शोमध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल जागृती करण्यात येणार असून आणि भारतीय हातमागाचंदेखील प्रमोशन करण्यात येणार आहे.
 
पुण्यातील चासा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि टेक्नॉलॉजीच्या वतीने अमृता फडणवीस शो-स्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरतील. ही इन्स्टिट्यूट गरिब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देते. विद्यार्थ्यांनीच डिझाईन केलेल्या कपड्यांचं यावेळी प्रमोशन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: डिझाईन केलेले कपडे परिधान करुन मॉडेल रॅम्पवर उतरतील तेव्हा त्यांच्या हातात मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचं आवाहन करणारे पोस्टर्सदेखील असतील. 
 
अमृता फडणवीस यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत 'मुलींच्या शिक्षणावर भर द्या हा संदेश पोहोचवण्यासाठी मी रॅम्पवर उतरणार आहे. ज्यांनी हे कपडे डिझाईन केले आहेत त्या सर्व शेतकरी आणि मजुरांच्या मुली आहेत. हा अभिनव उपक्रम आहे. मुलगी शिकली की एक कुटुंब शिकतं यावर माझा विश्वास आहे. आणि जेव्हा कुटुंब शिकतं तेव्हा देशाची प्रगती होती,' असं बोलल्या आहेत.
 
अमृता फडणवीस याअगोदरही रॅम्पवर उतरल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी नॅशनल इन्सिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीसाठी त्यांनी रॅम्प वॉक केला होता.