शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

मिसेस सीएम मेडिकलमध्ये!

By admin | Updated: June 15, 2014 00:44 IST

मेडिकलला आतापर्यंत ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांच्याकडून झाले नाही ते दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्वशीला चव्हाण यांनी करून दाखविले. आज शनिवारी त्यांनी मेडिकलच्या अपघात विभागापासून

पावणे दोन तासात पिंजून काढले रुग्णालय : ओपीडीपासून ते ओटीची केली पाहणीनागपूर : मेडिकलला आतापर्यंत ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांच्याकडून झाले नाही ते दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्वशीला चव्हाण यांनी करून दाखविले. आज शनिवारी त्यांनी मेडिकलच्या अपघात विभागापासून ते बाह्यरुग्ण विभाग, विविध वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष अशा एकूण २० ठिकाणी भेटी दिल्या. मेडिकलच्या समस्या जाणून घेतल्या. पाहणीत ज्या-ज्या रुग्णांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या त्यांच्या समस्या त्याच वेळी सोडविल्या. एवढेच नाही तर त्या किचनमध्ये जाऊन भांडी कशी साफ ठेवायची, याचा कानमंत्रही दिला. कुठेही न बसता, तब्बल पावणे दोन तासात त्यांनी अर्धेकअधिक मेडिकल पिंजून काढले. मेडिकलमध्ये व्हीआयपी येणे हे नवीन नाही. परंतु आतापर्यंत ते एखाद्या कार्यक्रमासाठी, विभागाच्या किंवा यंत्राच्या उद्घाटनासाठी आणि विशिष्ट रुग्णाची पाहणी करण्यासाठी येत असत. मात्र मिसेस सीएम यांनी केलेल्या पाहणीने आज सर्वच थक्क झाले. दुपारी १२ वाजता त्या मेडिकलच्या अपघात विभागात दाखल झाल्या. कुठेही न थांबता थेट सीएमओ कक्षात गेल्या. उपस्थित डॉक्टरांना औषधांविषयी विचारले. तिथून त्या बाह्यरुग्ण विभागात आल्या. शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत होते. त्यांना ‘डिस्टर्ब’ न करता वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांच्याकडून माहिती घेतली. तिथून त्या सायकॅट्रिक विभाग, ईसीजी कक्ष, एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग आणि स्त्री रोग व प्रसूती विभागात गेल्या. या विभागातील महिला रुग्णांची आस्थेने चौकशी केली. डॉक्टरांकडून येथील समस्या जाणून घेतल्या. याच विभागाच्या वॉर्ड क्र. २१ आणि २२ मध्येही त्यांनी भेट दिली. प्रत्येक रुग्णाजवळ जाऊन काय झाले, उपचार बरोबर मिळतो आहे ना, अशी आस्थेने चौकशी केली. तिथून त्या वॉर्ड क्र.२३ मध्ये आल्या. वैद्यकशास्त्र विभागाचा हा वॉर्ड रुग्णाने फुल्ल होता. ते पाहून किती रुग्ण आहेत, याची चौकशी परिचारिकेकडे केली. ४० खाटा ४६ रुग्ण असा आकडा परिचारिकेने दिला. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, धावपळ होत असली तरी सर्वांकडे लक्ष ठेव असा सल्ला दिला. त्यानंतर वॉर्ड क्र. २४ अतिदक्षता विभागात आल्या. तेथील गंभीर रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शस्त्रक्रिया कक्ष ‘ओटी-जी’च्या आत जाताना त्यांनी गाऊन चढवला. चप्पल काढून ठेवली. नंतर वॉर्ड क्र. २५, पेर्इंग वॉर्ड त्यातही व्हीव्हीआयपी कक्षाची पाहणी केली. त्यांनी आपल्या पाहणीतून किचनही सोडले नाही. पहिल्या मजल्यावरी किचनमध्ये पायऱ्या चढून त्या गेल्या. आज मेनू काय, असा प्रश्न विचारीत त्यांनी सफाईकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. नवजात शिशू विभागाच्या वॉर्ड क्र. ८ मध्ये आल्या तेव्हा नवजात शिशूला कवटाळून बसलेल्या सर्व मातांशी त्यांनी चौकशी केली. धीर दिला. तुझे बाळ बरे होईल, असा विश्वास दिला. वॉर्ड क्र. ३ मधील थॅलेसिमिया आणि सिकलसेलच्या डे-केअर सेंटरची पाहणी केली. बालरोग अतिदक्षता विभाग, नवजात शिशू विशिष्ट सेवा विभागाचीही त्यांनी पाहणी केली. (प्रतिनिधी)रुग्णांशी संवाद साधावॉर्ड क्र. २३ची पाहणी करून बाहेर पडत असताना एका तरुणीने डॉक्टर रुग्णाकडे लक्ष देत नसल्याची तक्रार केली. त्या तरुणीचा हात पकडीत पुन्हा वॉर्ड २३ मध्ये गेल्या, तेथील डॉक्टराला याचा जाब विचारला. भांबावलेल्या त्या डॉक्टराने तो रुग्ण हृदयविकाराचा आहे, त्याला सलाईन लावण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु त्याचे दोन्ही हात सुजलेले असल्याने नस सापडत नाही. भूलतज्ज्ञांना कळविले आहे. या वाक्याने मिसेस सीएम यांचे समाधान होताच, त्या तरुणीला डॉक्टर आपले काम करीत असल्याचे सांगून ओरडू नका, त्यांना सहकार्य करा असा सल्ला दिला. त्याचबरोबर संबंधित डॉक्टरलाही रुग्णाशी संवाद वाढवा, अशी सूचना केली.