शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर खासदारकीचा राजीनामा : उदयनराजे

By admin | Updated: October 30, 2016 01:07 IST

सर्वसामान्य लोकांनी मोठे व्हायचे नाही का? प्रत्येकाच्या मनात महत्त्वकांक्षा असते. मीच आमदार, मीच अध्यक्ष, असे कुठे होते का? एकच सांगतो, कोणी काही म्हणत

सातारा : ‘सर्वसामान्य लोकांनी मोठे व्हायचे नाही का? प्रत्येकाच्या मनात महत्त्वकांक्षा असते. मीच आमदार, मीच अध्यक्ष, असे कुठे होते का? एकच सांगतो, कोणी काही म्हणत असेल; पण या नगरपालिका निवडणुकीत ४०-० नाही केले तर खासदारकीचा राजीनामा देईन,’ असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले. ‘सातारा विकास आघाडी’च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी कदम यांच्यासह आघाडीतील नगरसेवकांचे उमदेवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजे शनिवारी पालिकेत आले होते. पत्रकांराशी बोलताना ते म्हणाले की, ‘ज्या लोकांवर मी अत्यंत प्रेम करतो, त्यात माझे काका शिवाजीराव भोसले आहेत. ते त्यांच्यासोबत (शिवेंद्रसिंहराजे) अर्ज भरायला आले आहेत. त्यांना डावलून मी अर्ज भरायला आलो नसतो; पण तत्त्व हे तत्त्व असते. वाटेल त्या परिस्थितीत मोडेन; पण तत्त्वाशी तडजोड करणार नाही. ‘उदयनराजेंच्या आडमुठेपणामुळे मनोमिलन दुभंगले,’ असे वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी शुक्रवारी केले होते. यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘मी आडमुठेपणा केला असता तर २२ महिने तुरुंगामध्ये नसतो. मला कोणी तुरुंगामध्ये घातले ते सगळ्यांना माहीत आहे. (प्रतिनिधी)तो मै खुदकी भी नही सुनता !‘शत्रूचा शत्रू म्हणजे माझा मित्र मानणारापैकी मी नाही, मी सगळ्यांचाच मित्र आहे. माझी अवस्था अशी का झाली माहिती आहे का. माझं एक आवडतं गाणं आहे. ‘काय बाय सांगू.. कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज..,’ असं त्यांनी अगदी सुरात गाण म्हटलं. काय करायचं कोणाविषयी बोलायचं नाही. पण एक सांगतो, ‘एक बार जो मैने कमिटमेंट करदी, तो मै खुदकी भी नही सुनता.. एवढंच सांगतो,’ असं म्हणून त्यांनी हाताची चुटकी वाजवली आणि जमावाकडे बोट दाखवत, ‘या सगळ्यांशी कमिटमेंट केलीय,’ असे सांगितलं.