शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी दत्तक घेऊन गाव पोरकं सोडलं!

By admin | Updated: October 5, 2015 01:11 IST

सांसद आदर्श गाव योजनेत राज्यात सर्वाधिक ८ गावे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, ही योजना सुरू होऊन वर्ष उलटले तरी ठोस कामे होत नसल्याने ‘दत्तक घेतलं,

बापू बैैलकर, पुणेसांसद आदर्श गाव योजनेत राज्यात सर्वाधिक ८ गावे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, ही योजना सुरू होऊन वर्ष उलटले तरी ठोस कामे होत नसल्याने ‘दत्तक घेतलं, पोरकं सोडलं’ अशी या गावातील ग्रामस्थांनी भावना झाली आहे. आराखडे तयार झाले असून कामे अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकली आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यातील करंदी, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनी हवेलीतील वडगाव शिंद, माजिद मेमन यांनी जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी , सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील दापोडी, वंदना चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील सदुंब्रे, डी. पी. त्रिपाटी यांनी बारामतीतील मुर्टी ,संजय काकडे यांनी शिरूरमधील जांबूत आणि अशोक गांगुली यांनी पुरंदरमधील गुळूंचे गाव दत्तक घेतले आहे. ११ आॅक्टोबर २०१४ रोजी ही योजना कार्यान्वीत झाली असून ही गावे आॅक्टोबर २०१६ पर्यंत आदर्श करावयाची आहेत. मात्र, एक वर्षात केवळ ग्रामविकास आराखडे, बेसलाईन सर्व्हे झाले असून आता कुठे निविदा प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. कामे आलीच नाहीत व झालीही नाहीत, अशा भावना यातील काही गावांच्या ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दोन वर्षे आराखड्यात गेले. आता कुठे कामांना सुरूवात होत आहे. दापोडीचे सरपंच राजेंद्र नरोटे यांनी सांगितले की, कामांना आता वेग आला आहे. अंगणवाड्या, वाचनालय, प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. उद्या पोस्ट आॅफिसचे उद्घाटन होणार आहे. या योजनेचा नुकत्याच झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांसाठी ८ प्रकारचे आराखडे केले आहेत. यात राज्य व केंद्र सरकारच्या एकत्रित योजनांचा लाभ देण्यात येणार असून यात फक्त भौतिक सुधारणा न करता गावचे वातावरणच बदलण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार आमदार बाबुराव पाचर्णे यांनीही या गावांचे बजेट २९ कोटींपर्र्यत असून प्रत्यक्ष २ कोटी खर्च होतोय, मग विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. ---------आम्ही गावे परके सोडल्याच्या ग्रामस्थांच्या भावना आहेत. मात्र, आता दत्तक गावांमध्ये विकास योजना झपाट्याने होणार असून ग्रामस्थांना गावातच रोजगार उपलब्ध करुन ती स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत सांगितले आहे. वडगाव शिंदेचे सरपंच भरत काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, कामे आलीच नाहीत. आता मंजूर झाली आहेत. कधी कामे होणार, असा प्रश्न उपस्थित केला. आम्ही आमच्या परीने पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुर्टी गावचे माजी उपसरपंच तानाजी खोमणे यांनी सांगितले, अद्याप एकही काम सुरू झाले नाही. खासदारसाहेब या योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. ते पुन्हा फिरकले नाहीत. ग्रामपंचायतीला एवढा निधी मिळणार आहे, अशी पत्र फक्त येत आहेत. बरेच प्रस्ताव दिले आहेत. मात्र कोणत्याच कामासाठी पैैसे आले नाहीत.