शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या पूजाने गाठले माऊंट मेन्थोसा शिखर

By admin | Updated: July 22, 2014 00:39 IST

सर्वात कमी वेळात शिखर गाठण्याचा विक्रम

अकोला : हिमालयीन गिर्यारोहण हे एक अवघड साहस आहे. हे साहस करताना हिंमत, धैर्य आणि सोबतच आत्मविश्‍वास लागतो. या बळावरच अकोल्याच्या पूजा जंगमने माऊंट मेन्थोसा हे हिमालयीन शिखर सर केले. विशेष म्हणजे पूजा व तिच्या सहकार्‍यांनी सर्वात कमी वेळात ही मोहीम पूर्ण करून एक विक्रम स्थापित केला आहे. हा विक्रम करून पूजा सोमवारी अकोल्यात आली. त्यावेळी अजिंक्य साहसी संघाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिने आपले अनुभव कथन केले. दिल्ली येथील इंडियन माऊंटरिंग फाऊंडेशन या इंडियन आर्मीच्या संचलनात चालविल्या जाणार्‍या संस्थेच्या माध्यमातून विविध गिर्यारोहण मोहिमांचे आयोजन करण्यात येते. या मोहिमेत देशभरातील गिर्यारोहक सहभागी होतात. यावर्षी या मोहिमेत अकोल्याची पूजा जंगम ही युवती सहभागी झाली होती. तिने समुद्रसपाटीपासून ६,४४३ मीटर उंच असलेल्या हिमालयातील माऊंट मेन्थो शिखर सर करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे फक्त मुलींसाठीच असलेल्या या मोहिमेत पश्‍चिम भारतातून सहभागी झालेली पूजा ही एकमेव मुलगी आहे. एकूण ११ युवतींनी या मोहिमेत सहभाग घेतला. पूजाने हिमाचल प्रदेशातील हिमालयीन रागांमधील माऊंट मेन्थो शिखर सर करून गिर्यारोहणात आणखी एक पाऊल टाकले आहे.