शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोटरमन, गार्डची सुरक्षा वा-यावरच

By admin | Updated: October 6, 2014 05:05 IST

एखादी ट्रेन लेट झाल्यास मोटरमन आणि गार्डला होणारी मारहाण पाहता आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) आणि जीआरपीकडून त्यांना सुरक्षा पुरविण्यात येणार होती

मुंबई : एखादी ट्रेन लेट झाल्यास मोटरमन आणि गार्डला होणारी मारहाण पाहता आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) आणि जीआरपीकडून त्यांना सुरक्षा पुरविण्यात येणार होती. मात्र नाही पोलिसांचा वॉच, नाही वॉकीटॉकी असेच चित्र सध्या असून, अजूनही मोटरमन आणि गार्डची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. लोकल उशिराने धावल्यास किंवा सुटल्यास तसेच अपघात झाल्यास मोटरमन आणि गार्डला जबाबदार धरून त्यांना मारहाण केली जाते. अशामुळे मोटरमन किंवा गार्ड हे आंदोलनाचे हत्यार उपसतात आणि मग लोकल सेवेचा बोजवारा उडतो. रेल्वे कर्मचाऱ्यांना होत असलेल्या अशा मारहाणीमुळे सुरक्षेचे उपाय म्हणून लोकल टे्रन आणि एक्स्प्रेसमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस आणि सुरक्षा बल जवानांचा मोबाइल क्रमांक, बक्कल क्रमांक, मोटरमन-गार्ड यांना द्यावा, असे रेल्वेने पोलिसांना सुचविले. तशा आशयाचे पत्र रेल्वेने रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांना पाठवले होते. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोटरमन-गार्ड यांच्या मदतीसाठी सुरक्षा बल आणि पोलिसांचे मोबाइल क्रमांक आणि वॉकीटॉकी यांसारख्या संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून मदत मिळवता येणे शक्य होेणार होते. रात्री ८ ते सकाळी ५ या दरम्यान महिला डब्यातील पोलिसांचा क्रमांक मोटरमन आणि गार्ड यांच्याकडे नोंद करण्याच्या सूचनाही देणार होत्या. मात्र तसे न झाल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.मोटरमन आणि गार्डला मारहाण करू नये, हा एक गुन्हा मानला जाईल, अशा पोस्टर्सद्वारे प्रवाशांमध्ये नुसतीच जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मोटरमन आणि गार्डची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे यावरून दिसते. (प्रतिनिधी)