शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलींचा खून करून मातेची आत्महत्या

By admin | Updated: May 27, 2016 00:28 IST

मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने विवाहितेने तीन मुलींचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना

औरंगाबाद : मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने विवाहितेने तीन मुलींचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.राधा संतोष त्रिभुवन (२४) हिने पोटच्या तीन मुली राजनंदिनी (७), कोमल (४) आणि प्रांजल (२) यांचा खून करून स्वत:चेही जीवन संपविले. राधा आणि संतोष यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला. राधाच्या माहेरच्या लोकांनी जावयाला एक लाख रुपये दिले होते. त्यानंतरही त्यांच्याकडून पैशांची मागणी होत होती. पहिल्या दोन मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा त्रास वाढला होता. संतोष तिला बेदम मारहाण करायचा. त्यामुळे तिने तीन वर्षांपूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली होती. तेव्हा तिच्या नंदई आणि अन्य नातेवाईकांनी यापुढे कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी दिल्याने ती नांदावयास गेली होती. त्यानंतर तिने तिसऱ्या मुलीस जन्म दिला आणि तिच्या त्रासात अधिक भर पडल्याचे राधाच्या आईने सांगितले. गुरुवारी पहाटे राधाने गळफास घेतला. कुटुंबियांंनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. दुसरीकडे राजनंदिनी, कोमल आणि प्रांजल या तिघी झोपेतून उठल्याच नाहीत. तपासणीत त्यांचाही मृत्यू झाल्याचे आढळले. (प्रतिनिधी)