शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

त्याच्यासाठी आईच सरस्वती अन् शारदाही!

By admin | Updated: March 8, 2015 01:52 IST

चिंचवडमधील एका मातेने कष्टपूर्वक आपल्या मुलातील कमतरतेवर मात करून त्याच्यात विशेष नैपुण्य आणले आहे. अक्षर न जाणणारा पृथ्वी आता शास्त्रीय गायक बनला आहे.

संजय माने ल्ल पिंपरी-चिंचवडनिसर्गत: बौद्धिक, शारीरिक कमतरता असलेल्या मुलांचे संगोपन करण्याचे पालकांसमोर मोठे आव्हान असते. परंतु पिंपरी-चिंचवडमधील एका मातेने कष्टपूर्वक आपल्या मुलातील कमतरतेवर मात करून त्याच्यात विशेष नैपुण्य आणले आहे. अक्षर न जाणणारा पृथ्वी आता शास्त्रीय गायक बनला आहे. इंगळे दाम्पत्याचा लाडका ‘पृथ्वी’ सर्वसाधारण मुलांप्रमाणे नाही. त्याला ‘विल्यम सिंड्रोम’ आहे. त्यामुळे त्याच्या शारीरिक वाढीवर मर्यादा आहेत. स्पीच, अ‍ॅक्युपेशनल, म्युझिक, प्ले व मसाज थेरपी याद्वारे त्याच्यात बदल घडवून आणावे लागतील, असे डॉक्टरांनीही सांगितले होते. दया इंगळे डॉक्टरांच्या सल्लानुसार मुलाला घडविण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. संसार सांभाळत त्याच पृथ्वीच्या डॉक्टर बनल्या. त्याच्यासोबत तासन्तास घालवत डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक उपचार केले. त्यामुळे सुरुवातीला तीन वर्षे शब्दोच्चारही करू शकत नसलेला पृथ्वी बोलू लागला. स्वत:ची कामे स्वत: करू लागला. कोठूनही संगीत कानी पडले तर तो रडता रडता शांत व्हायचा. त्यातून त्याला संगीताची आवड आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे संगीत शिक्षकामार्फत त्याच्यावर ड्रम थेरपी करण्यात आली. ठेका, ताल याला तो विशेष प्रतिसाद देऊ लागला. त्याला औंध येथील बालकल्याण संस्थेत नेऊन गायन शिकविण्यास सुरुवात केली. त्यातून पृथ्वीमध्ये आमूलाग्र बदल घडून आले. ११ वर्षांच्या पृथ्वीने शास्त्रीय संगीताची पहिली परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. आता तो २५ शास्त्रीय राग गाऊ शकतो. शास्त्रीय व सुगम संगीत या विषयांवरील दोन तासांच्या संगीत मैफलीत तो सहभाग घेतो. तो उत्तम पियानो वाजवतो. महापालिकेत कार्यकारी अभियंता असलेले त्याचे वडील सतीश इंगळे यांनाही गायनाची आवड आहे. त्यांच्याबरोबर पृथ्वी जुगलबंदीही करतो. ‘पृथ्वी थेरपी सेंटर’ नव्हे एक चळवळ!पृथ्वीसारख्या इतर मुलांसाठी काहीतरी करावे, या उद्देशाने पृथ्वीच्या आई-वडिलांनी घरातच विशेष मुलांना घडविण्याचे केंद्र तयार केले आहे. ‘पृथ्वी थेरपी सेंटर’मध्ये आता सुमारे २० विशेष मुलांना एकाच ठिकाणी विविध थेरपींची सुविधा प्राप्त झाली आहे. त्यांच्यातही बदल घडून येत आहेत.