शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

बहिणीवर अत्याचार करणा-या मुलाची आईनेच केली हत्या

By admin | Updated: October 29, 2015 09:13 IST

दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीवरच बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध मुलाला जन्मदात्रीने रौद्ररूप धारण करून यमसदनी धाडल्याची घटना चिखली येथे मंगळवारी रात्री घडली

चिखली (बुलडाणा) : दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीवरच बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध मुलाला जन्मदात्रीने रौद्ररूप धारण करून यमसदनी धाडल्याची घटना चिखली येथे मंगळवारी रात्री घडली. मुलीची अब्रू वाचविण्यासाठी मुलावर आधी तलवारीने वार आणि मग गळा दाबून त्याला ठार मारणाऱ्या या मातेने घटनेनंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. रामानंद नगरमध्ये राहणाऱ्या शोभाबाई शेषराव जाधव यांना कृष्णा आणि ज्ञानेश्वर ही दोन मुले आणि चार मुली आहेत. कृष्णा (२१) हा रिक्षा चालविण्याचे काम करतो; मात्र त्याला दारूचे व्यसन जडल्याने घरी नेहमीच वाद होत असत. दारूच्या नशेत तो नेहमीच आई आणि दोन बहिणींशी लगट करायचा. मंगळवारी रात्री दारूच्या नशेत त्याने तलवारीचा धाक दाखवून, बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिची आरडाओरड ऐकून शोभाबार्इंनी घरात धाव घेतली; मुलाचे दुष्कृत्य पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी लोखंडी पाईपने मुलावर हल्ला चढवून, त्याच्या हातातील तलवार हिसकावून घेतली. याच तलावारीने त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर असंख्य वार केले. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन कृष्णा जमीनीवर कोसळला. त्यानंतर शोभाबार्इंनी गळा आवळून त्याचा खून केला. मुलाचा खून केल्यानंतर शोभाबार्इंनी आत्मसमर्पण करून, घटनेची संपूर्ण माहिती दिली.