शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मोतेवारच्या पत्नीने लपविलेले दागिने झाले हस्तगत

By admin | Updated: July 28, 2016 19:40 IST

समृद्ध जिवनच्या महेश मोतेवार यांना अटक झाल्यानंतर सुरु झालेल्या छापा सत्रादरम्यान त्यांच्या पत्नीने लपविण्यासाठी चालकाकडे दिलेले तब्बल चार किलो सोन्याच्या दागिन्यांपैकी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८ : समृद्ध जिवनच्या महेश मोतेवार यांना अटक झाल्यानंतर सुरु झालेल्या छापा सत्रादरम्यान त्यांच्या पत्नीने लपविण्यासाठी चालकाकडे दिलेले तब्बल चार किलो सोन्याच्या दागिन्यांपैकी तीन किलो दागिने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. हे दागिने चालकाच्या घरामधून दरोडेखोरांनी चोरुन नेले होते. याबाबत तक्रार देऊ नकोस असेही मोतेरावांच्या पत्नीने चालकाला सांगून ठेवल्याचेही तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. पोलिसांनी एकूण 88 लाख 42 हजार 140 रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत.

निलेश भाऊसाहेब कोळपे (वय 31, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड), वाल्मिक बिरा कोळपे (वय 30) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारे सोनार व्यंकटेश ऊर्फ पप्पू तुळशीदास दहीवाळ (वय 32, रा. गणेश कॉलनी, थेरगाव), प्रदीप ऊर्फ बाळू येसू गायकवाड (वय 45, रा. बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली), भारत ज्ञानदेव पडळकर (वय 37, रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन मोतेवारचा चालक नरहरी देवराम घरत (रा. भालके कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांची फिर्याद घेण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 23 लाख आणि वाकड येथील ह्यअ‍ॅमेझॉनह्णची 19 लाखांची तर रोकड लुटल्याप्रकरणी निलेश आणि वाल्मिक यांना अटक केली होत्री. त्यांच्याकडे अधिक तपास सुरु असताना आरोपींनी घरत याच्या घरामधून 4 किलो सोन्याचे दागिने मारहाण करुन लुटल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तातडीने हालचाली करीत एक किलो दागिने जप्त केले. मात्र, याप्रकरणी गुन्हाच दाखल नसल्याचे तपासात समोर आले. आरोपींकडे कसून तपास करुन आणखी दोन किलो सोने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, अन्सार शेख, उपनिरीक्षक विलास पालांडे, प्रमोद वेताळ, संतोष बर्गे, अमित गायकवाड, संजय गवारे, गणेश काळे, दिलीप लोखंडे, राजेंद्र शेटे, राजू मचे, राजाराम काकडे, धर्मराज आवटे, प्रविण दळे, प्रमोद लांडे, प्रमोद हिरळकर, स्वप्ंल शिंदे, गोपाळ ब्राम्हंदे यांच्या पथकाने केली. महेश मोतेवार यांना अटक झाल्यानंतर सीबीआयने त्यांच्या कार्यालय तसेच घरांवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यांची लीना मोतेवार यांनी घरामधील तब्बल चार किलो सोन्याचे दागिने दोन डब्यांमध्ये भरुन त्यांचा चालक नरहरी घरत याच्याकडे लपविण्यासाठी दिले होते. हे दागिने घरतच्या घरामधून कोळपे टोळीने मारहाण करुन लुटून नेले होते. याबाबत घरत यांनी चोरी झाल्याचे लीना मोतेवार यांना सांगितले. मात्र, लीना यांनी घरत यांच्यावरच संशय व्यक्त केला. तसेच त्यांना गावी राहण्यास पाठवून दिले. पोलिसांकडे तक्रार देऊ नकोस असेही लीना यांनी घरत यांना बजावले होते असेही पोलिसांनी सांगितले.मोतेवारचा चालक घरत आणि आरोपी एकाच भागात राहणारे आहेत. घरतच्या घरी नेहमी रात्री उशीरापर्यंत महागड्या आणि आलिशान मोटारींमधून कोणी ना कोणी येत असे. त्यामुळे आरोपींची नजर घरतवर गेली. त्यांना त्याच्याकडे घबाड मिळू शकते असा विश्वास वाटत होता. त्यामुळेच आरोपींनी घरतच्या घरावर दरोडा टाकला होता.