शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक बलात्कार महाराष्ट्रात !

By admin | Updated: August 20, 2015 12:33 IST

पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर बलात्काराची विकृती वाढीला लागल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नातेवाइकांनीच

जयेश शिरसाट , मुंबई पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर बलात्काराची विकृती वाढीला लागल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नातेवाइकांनीच आया-बहिणी, मुलींवर अत्याचार केला, असे विकृत व अत्यंत धक्कादायक गुन्हे देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात मोठ्या संख्येने घडले आहेत. बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे परिचितांकडून घडतात, हे तपासातून अनेकदा समोर येते. मात्र आजोबांनी नातीवर, बापाने मुलीवर, भावाने बहिणीवर तर मुलाने आईवर बलात्कार करणे हे गुन्हे पोलीसदेखील अत्यंत विकृत आणि गंभीर प्रकारातील मानतात. गेल्या वर्षी ९४ मुली-महिलांवर रक्ताच्या नातेवाइकांनी अतिप्रसंग केल्याचा एनसीआरबी रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. असे गुन्हे केरळ (६२), राजस्थान (५९), मध्य प्रदेश (५९) आणि उत्तर प्रदेश (५१) याही राज्यांमध्ये घडले आहेत. मात्र त्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी संपूर्ण देशभरात ३७,४१३ बलात्काराचे गुन्हे नोंदले गेले. महाराष्ट्रात ३ हजार ४६५ जणींवर बलात्कार करण्यात आला. या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे. तर मध्य प्रदेश (५०८५), राजस्थान (३,७७०), उत्तर प्रदेशात (३,४६८) महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त गुन्हे घडले आहेत. असे असूनही या राज्यामध्ये नातेवाइकांकडून बलात्कार घडण्याचे प्रमाण कमी आहे. या तीन राज्यांच्या तुलनेत १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलींवर महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्कार घडलेत. महाराष्ट्रात ६ वर्षांपर्यंच्या ११२, ६-१२ वयोगटातील २५३ आणि १२ ते १६ वयोगटातील ७३१ मुलींवर बलात्कार झाले आहेत. ६ वर्षांपेक्षा खालील चिमुरडींवर बलात्कारात दिल्ली (७१) दुसऱ्यास्थानी आहे. मात्र मध्य प्रदेशात हे प्रमाण ४३ आहे. यूपीत ५३ आणि राजस्थानात २ इतके आहे. महाराष्ट्रात १ ते १६ वर्षे वयोगटातील १,०९६ मुलींवर बलात्कार झाले. हेच प्रमाण यूपीत ८८६, राजस्थानमध्ये ३७५ इतके आहे.