शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

‘बलात्काराच्या बहुतांशी तक्रारी ‘ब्रेकअप’नंतरच’

By admin | Updated: December 30, 2016 02:57 IST

बलात्काराच्या बहुतांशी तक्रारी ब्रेकअपनंतरच करण्यात येतात, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्त केली.

मुंबई : बलात्काराच्या बहुतांशी तक्रारी ब्रेकअपनंतरच करण्यात येतात, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्त केली.ब्रेकअपनंतर प्रेयसीने बलात्काराचा आरोप करत, एफआयआर नोंदवल्याने २० वर्षीय मुलाने तो रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.एकमेकांच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर, नात्यात कडवटपणा आल्यानंतरच बलात्काराच्या तक्रारी नोंदवण्यात येतात. अशा तक्रारींमध्ये वाढ होत आहे, ‘अनेकदा असे सांगितले जाते की, मुलाने विवाह करण्याचे आश्वासन दिल्याने मुलीने शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती दिली. जर मुलाने असे आश्वासन दिले नसते, तर मुलीने असे संबंध ठेवण्यास नकार दिला असता. बहुतांशी केसेस अशाच असतात,’ असे खंडपीठाने म्हटले. मुलीने बलात्काराची तक्रार केली, तर कायद्यानुसार पोलिसांना एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे, असेही खंडपीठाने म्हटले. विवाहापूर्वी सहमतीने शारीरिक संबंध ठेवणे, या पूर्वीही बेकायदेशीर नव्हते. आता तर खुद्द विधिमंडळाने अशा संबंधांना ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ म्हणत, अशा नात्यात असणाऱ्या महिलांना ‘घरगुती हिंसाचार’ कायद्यांतर्गत संरक्षण दिले असल्याचे खंडपीठाने म्हटले. पोलिसांनी अशा केसेसमध्ये कसा तपास करावा, याबाबत आम्ही विचार करत आहोत. पोलिसांनाही यावर विचार करावा लागेल, असे म्हणत खंडपीठाने एफआयआर रद्द केला. (प्रतिनिधी)