शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत तोतयेगिरी करणारे आणखी तिघेजण गजाआड

By admin | Updated: May 1, 2016 01:21 IST

तीनही आरोपी जालना जिल्हय़ातील.

अकोला: जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी 'डमी' उमेदवार उभा क रणार्‍या उमेदवारासह चौघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी २0 एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल करून राजू पहुरे, विठ्ठल सिसोदे व कल्याणसिंह बमनावत या तिघांना अटक केली. यातील फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यांना ५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पडताळणी केल्यानंतर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या औरंगाबाद जिल्हय़ातील जोडवाडी येथील रहिवासी राजू रामलाल पहुरे (२४) या उमेदवाराने शारीरीक चाचणी स्वत: दिली; मात्र लेखी परीक्षेला त्याने जालना जिलतील निहालसिंहवाडी येथील रहिवासी विठ्ठल त्र्यंबक सिसोदे (२२) हा बसला असल्याचे उघडकीस आले. अधिक चौकशीमध्ये राजू पहुरे व लेखी परीक्षा देणारा डमी उमेदवार सिसोदे यांच्यात जालना जिलतील निहालसिंहवाडी येथील कल्याणसिंह अंबरसिंह बमनावत व संदीप इंदर जाधव यांनी मध्यस्थी केल्याचे समोर आले. या दोघांच्या मध्यस्थीने राजू पहुरे याने विठ्ठल सिसोदे याला लेखी परीक्षा देण्यासाठी दोन लाख रुपये कबूल केले होते; मात्र पोलिसांच्या पडताळणीमध्ये त्याचा पर्दाफाश झाल्यानंतर राजू रामलाल पहुरे, विठ्ठल सिसोदे, कल्याणसिंह बमनावत व संदीप जाधव या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या तिघांना अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी फरार संदीप इंदल जाधव(२२) याच्यासह चंपालाल लालचंद बैनाडे(२२ रा. किनगाववाडी जि. जालना), युवराज प्रेमसिंग नार्‍हेडे(रा. नेहालसिंगवाडी जि. जालना) यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणाचा तपास स् थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, एपीआय प्रकाश झोडगे करीत आहेत.