शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उष्माघाताचे ४५०० हून अधिक कॉल

By admin | Updated: May 26, 2016 02:08 IST

राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून

पुणे : राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून तब्बल चार हजार ५२१ कॉल उष्माघाताचा त्रास झाला म्हणून आले आहेत. तीव्र झळांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जनजीवन होरपळून गेले आहे. साहजिकच तेथील नागरिकांना उष्माघाताचा जास्त त्रास झाला. उन्हामुळे डोकेदुखी, ताप, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास या समस्यांचे स्वरुप तीव्र होते. प्रसंगी व्यक्ती बेशुद्ध होऊन तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशावेळी १०८ क्रमांक फिरवून अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.याबाबत माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी सर्व्हीसेसच्या डॉ. ज्योत्स्ना माने म्हणाल्या, साधारणत: दरवर्षीच उन्हाळ््याच्या दिवसात डायल १०८ ला अशाप्रकारचे कॉल येतात. मात्र यावर्षी ही संख्या जास्त असल्याचे दिसते. साधारणत: फेब्रुवारी आणि मार्च वैशाख वणव्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढतात. राज्यभरातून फेब्रुवारीमध्ये १४०४ कॉल उष्माघाताच्या रुग्णांचे आले. तर मार्च आणि एप्रिलमध्ये अनुक्रमे १६०७ व १५१० कॉल आले. सर्वाधिक कॉल अमरावतीतून आले असून त्यांची संख्या ७७१ इतकी आहे. त्याखालोखाल यवतमाळमधून २५७ कॉल आले. उष्माघाताने मरण पावलेल्यांची सर्वाधिक संख्या विदर्भातच आहे. यशिवाय मुंबईतून २४८ कॉल उष्माघातासाठी आले. शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ‘डायल १०८’ ही तातडीच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)